‘उजनी’तील पाणी ८२ टक्क्यांवर

सोलापूर ः जिल्ह्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या उजनी धरणामध्ये वरच्या बाजूच्या पुणे जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग अखंड सुरु आहे. त्यामुळे उजनी धरमातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.
  The water in Ujani is at 82 percent
The water in Ujani is at 82 percent

सोलापूर  ः जिल्ह्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या उजनी धरणामध्ये वरच्या बाजूच्या पुणे जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग अखंड सुरु आहे. त्यामुळे उजनी धरमातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. सोमवारी (ता.२४) धरणाची पाणी पातळी ८१.४५ टक्केवर पोचली. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. परिणामी, या धरणातील अतिरिक्त पाणी दौंडकडून उजनी धरणाकडे सोडण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून उजनी धरणामध्ये कमी-अधिक प्रमाणाता पाण्याचा विसर्ग सुरु होताच. पण, गेल्या आठवड्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस पडत राहिला. त्यामुळे विसर्गात मोठी वाढ झाली. गेल्या सोमवारी (ता.१७) ५० टक्‍क्‍यांपर्यंत असणारी पाणी पातळी आठ दिवसांतच जवळपास ३० टक्‍क्‍यांनी वाढली. 

गेल्या आठवड्यात दौंडकडून धरणात जवळपास २२ हजार ५८४ क्‍युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत होता. पण गेल्या काही  दिवसांत तो निम्म्याने कमी झाला आहे. सध्या १० हजार ९३९ क्‍युसेक इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. विसर्गातील सातत्यामुळेच धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत गेली.

सध्या मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस थांबला आहे.  त्यामुळे संथगतीने पाणी पातळी वाढत आहे. तरीही सोमवारी धरणाच्या पाण्याने ८१.४५ टक्क्यांची पातळी गाठली. पाण्यातील हे सातत्य असेच राहिले. तर, येत्या आठवड्यात धरण शंभर टक्‍क्‍यांपर्यंत भरणार आहे.

सोमवारी ‘उजनी’तील पाणी

एकूण पाणीपातळी ४९५.९६० मीटर
एकूण पाणीसाठा   १०७.२९ टीएमसी
उपयुक्त साठा ४३.६३ टीएमसी
टक्केवारी ८१.४५ टक्के

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com