Agriculture news in marathi Water was released from Dhom-Balkwadi | Agrowon

धोम-बलकवडीतून पाणी सोडले

टीम अॅग्रोवन
सोमवार, 14 डिसेंबर 2020

यंदाच्या रब्बी हंगामासाठी वाई (जि. सातारा) तालुक्यातील धोम-बलकवडी धरण प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाण्याचे पहिले आवर्तन गुरुवारी (ता. १०) सोडण्यात आले. यामुळे भोर तालुक्यातील  शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

भोर, जि. पुणे : यंदाच्या रब्बी हंगामासाठी वाई (जि. सातारा) तालुक्यातील धोम-बलकवडी धरण प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाण्याचे पहिले आवर्तन गुरुवारी (ता. १०) सोडण्यात आले. यामुळे भोर तालुक्यातील वीसगाव खोरे व चाळीसगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाल्यानंतर त्याला पाण्याची गरज होती. म्हणून शेतकऱ्यांनी धोम-बलकवडी धरण प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी केला होती. त्यास प्रतिसाद देत सातारा सिंचन विभाग प्रशासनाने गुरुवारी धरणाच्या डाव्या कालव्यातून ७० क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात केली. कालव्यातून पाणी सोडल्यामुळे भोरच्या वीसगाव व चाळीसगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या विहिरींना व ओढ्यानाल्यांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. 

भोर तालुक्यातील १ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावरील गहू, हरभरा व ज्वारी आदी पिंकाना फायदा होणार आहे. त्यामुळे वीसगाव खोऱ्यातील प्रमुख गाव नेरे व चाळीगाव खोऱ्यातील आंबवडे गावातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. मात्र कालव्यात काही ठिकाणी गळती होत असल्यामुळे कालव्यातून पाणी सोडल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे.

गळतीमधून हजारो लीटर पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आल्यामुळे शेतीची तळी बनली आहेत. त्या शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. कालव्यास अस्तरीकरण करून देखील पाण्याची गळती सुरू असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात 
आहे.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...