Agriculture news in Marathi Water will be available from the mill, Hatnur Dam | Page 2 ||| Agrowon

गिरणा, हतनूरमधून मिळणार रब्बीसाठी आवर्तने

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा, हतनूर व वाघूर धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी किंवा आवर्तन मिळेल, हे निश्‍चित आहे. परंतु त्यासाठी अंतिम निर्णय जलसंपदा विभाग घेईल. कालवा समितीच्या शिफारशी, मागणी यानंतर जलसंपदा विभाग निर्णय घेईल. या कालवा समितीच्या बैठकीकडे लक्ष लागून आहे.

जळगाव ः जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा, हतनूर व वाघूर धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी किंवा आवर्तन मिळेल, हे निश्‍चित आहे. परंतु त्यासाठी अंतिम निर्णय जलसंपदा विभाग घेईल. कालवा समितीच्या शिफारशी, मागणी यानंतर जलसंपदा विभाग निर्णय घेईल. या कालवा समितीच्या बैठकीकडे लक्ष लागून आहे.

गिरणा, वाघूर, हतनूर हे प्रमुख सिंचन प्रकल्प आहेत. गिरणा धरणाच्या माध्यमातून ५१ हजार हेक्टर क्षेत्राचे रब्बीमध्ये सिंचन करणे शक्य आहे. हतनूर धरणाद्वारे सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे सिंचन करता येते. तर वाघूर धरणामुळेदेखील सिंचन क्षमता वाढली आहे. हतनूर धरणाची साठवण क्षमता नऊ टीएमसी, गिरणाची १८.४८ टीएमसी आणि वाघूरची ८.७६ टीएमसी एवढी साठवण क्षमता आहे. हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.

हतनूर, वाघूर व गिरणा धरणावर काही शहरांसह उद्योगासाठीदेखील पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. यासाठीदेखील वेगळे आरक्षण करावे लागेल. गिरणा धरणातून नदीत पाच वेळेस पाण्याचे आवर्तन टंचाई दूर करण्यासंबंधी सोडले जाते. सुमारे १०० गावांमधील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे पुनर्भरण करण्यासाठी गिरणा धरणातून नदीत पाणी सोडले जाते. तसेच नाशिकमधील मनमाड, मालेगाव, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा व भडगाव शहरांच्या पाणी योजनांनाही गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गिरणा नदीत यंदाही पाच वेळेस हे पाणी सोडले जाईल.

कानळदा (ता. जळगाव) पर्यंत हे पाणी सोडले जाईल. हतनूर धरणावर भुसावळ, दीपनगर औष्णिक वीजप्रकल्प आणि वरणगाव (ता. भुसावळ) येथील आयुध निर्माणीचा पाणीपुरवठादेखील अवलंबून आहे. वाघूर धरणावर जळगाव व जामनेर ही मोठी शहरे आणि काही मोठ्या उद्योगांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या पाण्याच्या आरक्षणाबाबतही कालवा समितीच्या बैठकीत चर्चा  होईल. यानंतर प्रशासन अहवाल तयार करील. ही बैठक दिवाळीपूर्वी होवू शकते. बैठकीनंतर जलसंपदा मंत्रालयास माहिती दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

रब्बीसाठी देता येईल तीनवेळा आवर्तन
गिरणा धरणाच्या माध्यमातून चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या तालुक्यात सिंचन करता येते. वाघूर धरणाद्वारे भुसावळ, जामनेर व जळगाव तालुक्यात रब्बीसाठी आवर्तन देता येते. तर हतनूर धरणाच्या माध्यमातून रावेर, यावल व चोपडा तालुक्यात रब्बीसाठी आवर्तन दिले जाते. या सर्व प्रकल्पांमधून रब्बीसाठी तीनदा आवर्तन देता येईल, अशी स्थिती आहे.


इतर ताज्या घडामोडी
बच्चू कडूंनी फुंकले रणशिंग; शेतकऱ्यांसह...अमरावती : तीन कृषी कायद्यांविरोधात देशातील...
डिसेंबरमधील पालवीवरच आंबा हंगाम अवलंबूनरत्नागिरी  : नोव्हेंबर महिन्यात थंडीऐवजी...
सुट्ट्यांमुळे कापूस खरेदीत खोडायवतमाळ : बहूप्रतिक्षेनंतर २७ नोव्हेंबरला...
कीड व्यवस्थापनासाठी करा जैविक पद्धतीचा...एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जैविक कीड...
कळमना बाजारात मोसंबी दरात सुधारणानागपूर : मागणीअभावी संत्रा दरात घसरण झाली आहे....
कोल्हापुरात टोमॅटोला दहा किलोस १५० रुपयेकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
परभणीत दीड लाख क्विंटल कापसाची खरेदीपरभणी :  भारतीय कापूस महामंडळाच्या वतीने (...
जळगाव जामोदमध्ये कापूस खरेदी सुरूबुलडाणा : कापूस पणन महासंघाच्या वतीने हमी भाव...
सटाणा तालुक्यात चार कोटींची नुकसानभरपाई...नाशिक  : सटाणा तालुक्यात ऑक्टोबर आणि...
भंडाऱ्यात ३४ कोटींची धान खरेदीभंडारा  : जिल्ह्यात आधारभूत दराने धान...
निम्न दुधानाचे बुधवारपासून आवर्तनपरभणी  : जिल्ह्यातील ब्रम्हवाकडी (ता. सेलू)...
भातपिकासह ट्रॅक्टर जळून खाकअस्वली स्टेशन, जि. नाशिक : इगतपुरी...
नगर जिल्ह्यात कांदा बियाण्याची टंचाईनगर (प्रतिनिधी) : नगर जिल्ह्यात यंदा खरीप व रब्बी...
ढगाळ वातावरणामुळे उसावर तांबेरासोमेश्वरनगर, जि. पुणे ः अतिवृष्टीपाठोपाठ आलेल्या...
आंब्यावरील कीड, रोग नियंत्रण व्यवस्थापनकोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही...
बुलडाणा : कांद्याचे निकृष्ट बियाणे...बुलडाणा : मध्यंतरीच्या काळात कांद्याच्या...
रब्बीसाठी पहिले आवर्तन पाच डिसेंबरला ः...जळगाव : ‘‘रब्बी हंगामासाठी गिरणा धरणातून तीन...
धुळे जिल्ह्यातील रब्बी क्षेत्रात होणार...कापडणे, जि. धुळे : जिल्ह्यात खरीप हंगामात पावसाने...
कुंभार पिंपळगावात आगीत चार एकर ऊस खाककुंभार पिंपळगाव, जि.जालना : राजाटाकळी- अरगडे...
द्राक्ष निर्यातवाढीसाठी शासन सहकार्य...अंतापूर, ता. सटाणा : ‘‘द्राक्षाचा पीकविमा बाराही...