पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः मुख्यमंत्री

पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः मुख्यमंत्री
पुराचे पाणी दुष्काळी भागाला देणार ः मुख्यमंत्री

कऱ्हाड, जि. सातारा ः महापुरामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, कऱ्हाडसह महामार्गाची मोठी हानी झाली. पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. जागतिक विक्रम मोडणारा पाऊस महाबळेश्वरमध्ये झाला. त्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी जागतिक बँक आणि आशिया विकास बॅंकेच्या सहकार्याने ते जादाचे पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे महापूर आला तरीही त्याचा फटका बसणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

मुख्यमंत्री फडणवीस कऱ्हाड दौऱ्यावर आले असताना ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, महापुराच्या पाण्याचे नियोजन करून ते दुष्काळी भागाला देण्यासाठीचा दूरदृष्टीने नियोजन आम्ही हाती घेतले आहे. महापूर आल्यानंतर हानी होऊ नये, यासाठी जागतिक बँकेने उपाययोजना केली आहे. नुकतेच जागतिक बँक व आशियन बॅंकेच्या २२ अधिकाऱ्यांचे पथक नुकतेच येऊन गेले. त्यांच्यासोबत आपत्ती व्यवस्थापन कसे करता येईल याचा आराखडा तयार करत आहोत. त्यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार आहे. 

त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या महाराष्ट्र उद्योगामध्ये आठव्या क्रमांकावरुन १३ व्या क्रमांकावर गेला या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ही आकडेवारी त्यांनी कोठून आणली हे मला नाहीत नाही. मात्र, त्यांनी ते मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर होता हे सत्य मान्य केले आहे. महाराष्ट्र उद्योगात पहिल्या तीन क्रमांकावर असताना तो आठव्या क्रमांकावर का गेला याचे उत्तर पृथ्वीराजबाबांनी दिले पाहिजे, ते दिशाभूल करणारे बोलत आहेत, अशी टीका त्यांनी केली. उदयनराजे भोसले यांनी तीन महिन्यांत राजीनामा दिला हा लोकशाहीचा खून आहे या पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा ही त्यांनी समाचार घेत लोकशाही काँग्रेसने पायदळी तुडवल्याची टीका केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com