येवला तालुक्यात `जलयुक्त`कडे काणाडोळा

जलयुक्त योजनेकडून मोठ्या अपेक्षा असून, तालुका दुष्काळी असल्याने अधिकाधिक व वेगाने कामे व्हायला हवीत. सर्वच विभागांनी तत्परता दाखवून मंजूर कामे वेगाने पूर्णत्वास न्यावीत. जेणेकरून पावसाळ्यात पाणी साठवणुकीला फायदा होईल. - रतन बोरणारे, तालुकाप्रमुख, शिवसेना
येवला तालुक्यात `जलयुक्त`कडे काणाडोळा
येवला तालुक्यात `जलयुक्त`कडे काणाडोळा

येवला, जि. नाशिक : तालुका दुष्काळी असूनही जलयुक्त शिवार योजनेतील चालू वर्षाच्या कामांकडे लघुपाटबंधारेसह जलसंधारण, वन व ग्रामपंचायत विभागाने स्पेशल कानाडोळा केल्याने कामे मंदावली आहेत. कृषी विभागाने मात्र नेहमीप्रमाणे कामांच्या प्रगतीत आघाडी घेतली आहे. दुष्काळाचा विचार करता प्रगतीतील व सुरू न झालेली कामे हाती घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

मागील दोन्ही वर्षी जलयुक्तमध्ये मोठ्या गावांचा समावेश असल्याने कामेही मोठीच मार्गी लागली, तर या वर्षी तिसऱ्या टप्प्यात तालुक्‍यातील १२ गावांचा समावेश असून, ही सर्व गावे कमी लोकसंख्येची असल्याने कामेही त्याच दर्जाची धरली आहेत.

या वर्षी गणेशपूर (३१), विसापूर (४५), गुजरखेडे (४१), आंबेगाव (४७), भारम (३४), देवदरी (४१), कौटखेडा (२६), गारखेडा (२६), न्याहारखेडा खुर्द (२९), न्याहारखेडा बुद्रुक (२४), पन्हाळसाठे (२५), भायखेडा (२९) या १२ गावांत शेततळे, बंडिंग, नाला खोलीकरण, गाळ काढणे आदी ३७८ कामांचा आराखडा प्रस्तावित केला होता. यापैकी कृषी विभागाकडे बाराही गावांत १२२, तर ग्रामपंचायत विभागाकडे १२० कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र, पुढे कृषी विभागाने सर्वाधिक कामे मार्गी लावली असून, जिल्हा परिषद लघुसिंचन, जलसंधारण, वन विभाग, सामाजिक वनीकरण या विभागांनी अक्षरशः कामांना कात्री लावत याकडे दुर्लक्षच केल्याचे आकडे सांगतात.

ग्रामपंचायतकडून घोर निराशा कृषीने १२२ पैकी ७३ कामांना चालना दिली असून, ४२ पूर्णही झाले आहेत. मात्र, ग्रामपंचायत विभागाने १२ गावांत १२० पैकी अवघी १३ कामे पूर्ण केली. पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष नसल्याने घोर निराशा झाली आहे. लघुसिंचन विभागाच्या ३१ पैकी ६, तर जलसंधारण विभागाच्या २० पैकी दोनच कामांना मुहूर्त मिळाला आहे. वन विभागाने तर कहर केला असून, आठपैकी एकही काम हाती घेतलेले नाही. सामजिक वनीकरणाने दोन्हीही व भूजल सर्वेक्षण विभागाने ९ पैकी ७ कामे हाती घेतली आहेत. ग्रामपंचायत विभागाच्या नाकर्तेपणामुळे अनेक कामे कागदावरच राहिली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com