नाशिक जिल्ह्यातील पाणीदार प्रकल्प कागदावरच

नाशिक जिल्ह्यातील पाणीदार प्रकल्प कागदावरच
नाशिक जिल्ह्यातील पाणीदार प्रकल्प कागदावरच

येवला, जि. नाशिक : पावसाच्या कृपेने धरणांचा असलेला जिल्हा तितकाच पाणीदारही आहे. हे प्रकल्प इतर जिल्ह्यांना फायद्याचे आहेत.  मात्र येथील जनता टंचाईसह दुष्काळाला सामोरे जात आहे. खोऱ्यांत पाणी उपलब्ध असताना ते उपयोगात आणण्याच्या उपाययोजना व नवे छोटे-मोठे प्रकल्प गेल्या १२ वर्षांत केवळ कागदावरच मिरविले जात आहेत. जिल्हा नव्या प्रकल्पांपासून कोसो दूर गेला आहे. या प्रकल्पांना मंजुरी दूरच, पण आहेत तेही राजकारणाच्या खेळात रखडले आहेत.

ब्रिटिशांनी जिल्ह्यात १९१६ मध्ये दारणा, तर १९६५ मध्ये गंगापूर हे धरण बांधले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गोदावरी व गिरणा खोऱ्यात सात मोठी आणि १७ मध्यम, अशी २४ धरणे पूर्णत्वास नेली. यातील दरसवाडी, कडवा, माणिकपुंज, गौतमी-गोदावरी हे प्रकल्प २००५-२००६ मध्ये पूर्णत्वास गेले. त्यानंतर एकाही प्रकल्पाला पूर्ण होण्याचा मुहूर्त अद्याप तरी मिळू शकलेला नाही.

गोदावरी व तापी खोऱ्याकडे वळविलेले पाणी साठविण्यासाठीच्या सुमारे ६९ विविध प्रकल्पांसह गोदावरी खोऱ्यात भाम, वाकी (२६०० दशलक्ष घनफूट), अपर कडवा (६५०), किकवी (१६००) आणि मांजरपाडा १ (६००) हे प्रकल्प मंजूर आहेत. त्यातील भाम व वाकी हे प्रकल्प पूर्णत्वाकडे आहेत. मात्र, किकवी व मांजरपाड्याला निधीची प्रतीक्षा असून, अपर कडव्याचे काम भूसंपादनात अडकले आहे. मांजरपाड्यासाठी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांनी सर्व ताकद पणाला लावली, तरीही कामाला कधी स्वपक्षातील, तर कधी विरोधी पक्षातील नेत्यांचा अडसर आला. परिणामी, २००६ नंतर जिल्ह्यात एकही नवा जलसिंचन प्रकल्प निर्माण झाला नाही. निफाडमधील सावरगाव, येवल्यातील देवनाचा मेळाचा, असे छोटे प्रकल्पदेखील कागदावरच आहेत.

गोदावरी तुटीचे खोरे असल्याने व नवीन प्रकल्पासाठी पाणीच उपलब्ध नसल्याच्या कारणाने कित्येक वर्षांपासून नवीन सिंचन प्रकल्पासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्रच मिळत नसल्याचे चित्र आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील अंबिका, औरंगा, नार-पार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा खोऱ्यात मुबलक पाणी आहे. ते अरबी समुद्रात वाहून जाते. हे पाणी गोदावरी व तापी खोऱ्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न केल्यास ७९ हजार दशलक्षघनफूट पाणी वापरासाठी मिळू शकेल. पश्‍चिमेकडील पाण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीने अभ्यास केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com