agriculture news in Marathi watermelon farming becoming profitable Maharashtra | Agrowon

कलिंगड शेती ठरते आहे फायदेशीर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

मी गेल्या वर्षी पावसाळ्यात कलिंगड लागवड केली होती. त्यानंतर सातत्याने लागवड केली. आता आमच्या भागात अनेक शेतकरी कलिंगडाचे पीक घेण्याकडे वळत आहेत. कमी काळात चांगले उत्पन्न या पिकापासून मिळत असल्याने तसेच व्यापारीही थेट खरेदीसाठी येत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
-गणेश इरतकर, शेतकरी तथा कृषी व्यावसायिक, शिरपूर जैन, ता. मालेगाव, जि. वाशीम

अकोला ः मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरात मागील दोन-तीन वर्षांपासून कलिंगडाची शेती फायदेशीर फार्म्युला ठरत आहे. शेतकऱ्यांनी यावर्षात पावसाळ्यातही हे पीक घेत एक पाऊल पुढे टाकले आहे. बेमोसमी लागवड करीत हे शेतकरी चांगले दर कलिगंडाला मिळवू लागले आहेत. सध्या काढणी होत असलेले कलिंगड या वर्षात सर्वाधिक २२०० रुपये क्विंटल दराने विक्री झाले आहे.

कलिंगडाचे पीक हे ६५ ते ९० दिवस या कालावधीत काढणीला येते. साधारणतः उन्हाळ्यात कलिंगडाची लागवड केली जाते. त्यामुळे या हंगातील क्षेत्र हे सर्वाधिक राहत असते. शिरपूर जैन (जि. वाशीम) परिसरातील शेतकऱ्यांनी पहिल्यांदा खरिपात कलिंगडाची लागवड करण्याचे धाडस केले. त्यात यशही मिळाले. 

या वर्षी २५ जुलै ते १५ आॅगस्ट या काळात शिरपूर जैन परिसरात ४० ते ४५ एकरात कलिंगडाची लागवड झाली होती. या वर्षी अति पाऊस झाल्याने उत्पादना फटका बसला. तरी एकरी १५ ते २० टनांचे उत्पादन मिळाले. सरासरी दर ११०० ते २२०० दरम्यान मिळाले. काढणीनंतर पुन्हा २५ एकरापेक्षा अधिक क्षेत्रावर सप्टेंबर ते १५ ऑक्टोबरदरम्यान लागवड झाली. सध्या या प्लॉटमधून कलिंगडाची काढणी सुरू आहे.

रविवारी (ता. १२) काढणी झालेल्या कलिंगडाला सर्वाधिक २२०० रुपये क्विंटलचा दर मिळाला. या हंगामातील उत्पादन हे २० ते ३० टनांपर्यंत राहिलेले आहे. कमी कालावधीत येणाऱ्या या पिकाकडे शेतकऱ्यांना कल असून, बिगर मोसमी लागवड करीत असल्यामुळे अधिक दर मिळत आहेत.

दिल्लीला गेले कलिंगड
शिरपूर जैन भागातील कलिंगड प्रामुख्याने दिल्ली बाजारपेठेत गेले आहे. व्यापाऱ्यांनी थेट खरेदी करीत हा माल नेला. साधारणतः ११०० रुपयांपासून २२०० रुपये प्रति क्विंटलचा दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. या वर्षी ४४ गाड्या कलिंगड दिल्लीला गेले. शेतकऱ्यांना पीक पेरणीपासून तर काढणीपर्यंत एकरी ५० हजारांपर्यंत खर्च लागतो.

प्रतिक्रिया
कलिंगडाचे पीक कमी दिवसामध्ये येते. यंदा पावसाळ्यात दीड एकरात लागवड केली होती. एकरी १२ टन उत्पादन झाले. या कलिंगडात १५०० रुपये क्विंटलला दर भेटला. त्यानंतर याच जागेवर नवरात्रीमध्ये पुन्हा कलिंगडाची लागवड केली. एकरात १८ टन उत्पादन झाले. १८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. आता त्या ठिकाणी खरबूज लागवड करणार आहे.
-सुरेश गाभणे, कलिंगड उत्पादक, शिरपूर जैन, ता. मालेगाव, जि. वाशीम

 


इतर अॅग्रो विशेष
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...