नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये

नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये
नाशिकमध्ये टरबूज प्रतिक्विंटल ७०० ते १५०० रुपये

नाशिक : नाशिकमध्ये टरबुजाची आवक ९६० क्विंटल झाली. त्यास ७०० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२०० मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून मिळाली.  

फळभाज्यांमध्ये कारल्याची आवक १८४ क्विंटल झाली. त्याला ३९५८ ते ६२५० दर प्रतिक्विंटल मिळाला. सर्वसाधारण दर ५००० मिळाला. वांग्याची आवक २६५ क्विंटल झाली. त्यास १३५० ते २७५० दरम्यान प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १५५० होते. फ्लॉवरची आवक २३७ क्विंटल झाली. त्यास ७८० ते १५०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १३५७ होता. कोबीची आवक ३२५ क्विंटल झाली. तिला ५८३ ते १०८५ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७९१ होता.

ढोबळी मिरचीची आवक २८६ क्विंटल झाली. तिला १९३७ ते ३१२५ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० होता. भोपळ्याची आवक ८०८ क्विंटल, तर दर २६६ ते १००० प्रतिक्विंटल राहिला. सर्वसाधारण दर ६६५ रुपये होता. दोडक्याची आवक ४० क्विंटल झाली. त्यास २०८५ ते ५८३३ प्रतिक्विंटल रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ४३०० रुपये होता. 

गिलक्याची आवक २९ क्विंटल झाली. त्यास १४५८ ते २७०८ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २२०८ होता. भेंडीची आवक ४८ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल १००० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २१८५ होता. गवारची आवक ३० क्विंटल होऊन तिला २००० ते ३००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २८०० रुपये राहिला.  

डांगराची आवक २५ क्विंटल झाली. त्यास ८०० ते १८०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १६०० होता. काकडीची आवक ९५० क्विंटल झाली. तिला सर्वसाधारण ६७५ ते १७५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ११७५ होता. लिंबूची आवक १२ क्विंटल झाली. त्यास २००० ते ४३०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० रुपये राहिल्याची माहिती मिळाली. 

फळांमध्ये पेरूची आवक ७ क्विंटल झाली. त्यास १२५० ते २५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २००० होता. डाळिंब आवक १०९६ क्विंटल झाली. त्यास ५५० ते ५६५० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३२५ होता. मोसंबीची आवक १०० क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० होता. 

खरबुजाची आवक १२० क्विंटल झाली. त्यास ९०० ते २४०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर २१०० होता.  कांद्याची आवक ३७४८ क्विंटल झाली. त्यास २७५ ते ९०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ६५० होता. बटाट्याची आवक १७६० क्विंटल झाली. त्यास ७५० ते १३०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ९५० होता. लसणाची आवक ५८ क्विंटल झाली. त्यास २५०० ते १०५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५०० राहिल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com