खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव विस्कळीत 

जळगावः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प असल्याने उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. सध्या फक्त जळगाव, धुळे, शहादा (जि. नंदुरबार), नंदुरबार या बाजारात लिलाव सुरू आहेत. या बाजारांमध्ये आवक वाढत असल्याने दर कमी मिळत आहेत. खर्चही निघणार नाही, अशी स्थिती झाली आहे.
watermelon Shivar purchase system jam in Khandesh, hit farmers
watermelon Shivar purchase system jam in Khandesh, hit farmers

जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प असल्याने उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. सध्या फक्त जळगाव, धुळे, शहादा (जि. नंदुरबार), नंदुरबार या बाजारात लिलाव सुरू आहेत. या बाजारांमध्ये आवक वाढत असल्याने दर कमी मिळत आहेत. खर्चही निघणार नाही, अशी स्थिती झाली आहे.  

कलिंगडाला एकरी किमान ३० ते ३५ हजार रुपये खर्च लागला आहे. एकरी २० ते २२ मेट्रिक टन मिळण्याची स्थिती आहे. लागवड धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, जळगावमधील चोपडा, यावल, जामनेर, पाचोरा, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव या भागात बऱ्यापैकी झाली आहे. ही लागवड मिळून सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टरवर झाली आहे. 

मागील हंगामात जागेवरच पाच ते सात रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना मिळाला होता. परंतु यंदा शिवार खरेदीच ठप्प आहे. कलिंगडाची ९५ टक्के विक्री थेट जागेवर किंवा शिवार खरेदीत केली जाते. खरेदीदार मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी भागातून येतात. परंतु परराज्यातील खरेदीदार येत नाहीत. शिवार खरेदी बंद असल्याने बाजार समित्यांमध्ये कलिंगड विक्रीसाठी आणावे लागत आहे. त्याला अपेक्षित दर मिळत नसल्याची स्थिती आहे. 

वाहतूक खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही लहान क्षेत्रधारक कलिंगड उत्पादक कलिंगडाची काढणी करून भाडेतत्त्वाने ट्रॅक्‍टर किंवा मालवाहू वाहन घेऊन त्याची विक्री गावोगावी जावून करीत आहेत. तीन ते चार किलोचे एक फळ १० ते १५ रुपयांत विक्री करावे लागत आहे. 

मध्यंतरी चोपडा, जळगाव भागातील कलिंगड उत्पादकांचे गारपिटीत नुकसान झाले. आता कोरोना विषाणूमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली. खरेदीदार मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती मिळाली. 

शिवार खरेदीला प्रोत्साहन द्यावे बाजार समित्यांध्ये काही खरेदीदार उधारीने खरेदी करीत आहेत. खर्चही निघणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या रोज १०० ते १२० मेट्रिक टन कलिंगड काढणीसाठी उपलब्ध आहे. शिवार खरेदीला प्रोत्साहन दिले जावे, अशी अपेक्षा शेतकरी संजय पाटील (यावल) यांनी व्यक्त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com