Agriculture news in marathi watermelon Shivar purchase system jam in Khandesh, hit farmers | Agrowon

खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव विस्कळीत 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 मार्च 2020

जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प असल्याने उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. सध्या फक्त जळगाव, धुळे, शहादा (जि. नंदुरबार), नंदुरबार या बाजारात लिलाव सुरू आहेत. या बाजारांमध्ये आवक वाढत असल्याने दर कमी मिळत आहेत. खर्चही निघणार नाही, अशी स्थिती झाली आहे. 

जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प असल्याने उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. सध्या फक्त जळगाव, धुळे, शहादा (जि. नंदुरबार), नंदुरबार या बाजारात लिलाव सुरू आहेत. या बाजारांमध्ये आवक वाढत असल्याने दर कमी मिळत आहेत. खर्चही निघणार नाही, अशी स्थिती झाली आहे. 

कलिंगडाला एकरी किमान ३० ते ३५ हजार रुपये खर्च लागला आहे. एकरी २० ते २२ मेट्रिक टन मिळण्याची स्थिती आहे. लागवड धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, जळगावमधील चोपडा, यावल, जामनेर, पाचोरा, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव या भागात बऱ्यापैकी झाली आहे. ही लागवड मिळून सुमारे दोन ते अडीच हजार हेक्‍टरवर झाली आहे. 

मागील हंगामात जागेवरच पाच ते सात रुपये प्रतिकिलोचा दर शेतकऱ्यांना मिळाला होता. परंतु यंदा शिवार खरेदीच ठप्प आहे. कलिंगडाची ९५ टक्के विक्री थेट जागेवर किंवा शिवार खरेदीत केली जाते. खरेदीदार मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी भागातून येतात. परंतु परराज्यातील खरेदीदार येत नाहीत. शिवार खरेदी बंद असल्याने बाजार समित्यांमध्ये कलिंगड विक्रीसाठी आणावे लागत आहे. त्याला अपेक्षित दर मिळत नसल्याची स्थिती आहे. 

वाहतूक खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही लहान क्षेत्रधारक कलिंगड उत्पादक कलिंगडाची काढणी करून भाडेतत्त्वाने ट्रॅक्‍टर किंवा मालवाहू वाहन घेऊन त्याची विक्री गावोगावी जावून करीत आहेत. तीन ते चार किलोचे एक फळ १० ते १५ रुपयांत विक्री करावे लागत आहे. 

मध्यंतरी चोपडा, जळगाव भागातील कलिंगड उत्पादकांचे गारपिटीत नुकसान झाले. आता कोरोना विषाणूमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली. खरेदीदार मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती मिळाली. 

शिवार खरेदीला प्रोत्साहन द्यावे
बाजार समित्यांध्ये काही खरेदीदार उधारीने खरेदी करीत आहेत. खर्चही निघणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या रोज १०० ते १२० मेट्रिक टन कलिंगड काढणीसाठी उपलब्ध आहे. शिवार खरेदीला प्रोत्साहन दिले जावे, अशी अपेक्षा शेतकरी संजय पाटील (यावल) यांनी व्यक्त केली. 


इतर बातम्या
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...