agriculture news in Marathi watermelon sold with help of social media Maharashtra | Agrowon

सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेतातच विकले कलिंगड 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 मार्च 2020

वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार नाही, ग्राहक नाही तरीही शेतीमालाची विक्री करायचीच असा निर्धार केला. त्यासाठी व्हॉट्सॲप, फेसबुक, फोन कॉल या माध्यमाचा वापर करून ग्राहकच थेट शेतात बोलवले.

पुणे ः वाहतूक बंद, मार्केट बंद, खरेदीदार नाही, ग्राहक नाही तरीही शेतीमालाची विक्री करायचीच असा निर्धार केला. त्यासाठी व्हॉट्सॲप, फेसबुक, फोन कॉल या माध्यमाचा वापर करून ग्राहकच थेट शेतात बोलवले. ग्राहकांनीही त्यास चांगला प्रतिसाद दिला. मळद (ता.बारामती) येथील शेतकरी प्रल्हाद वरे यांनी कलिंगड व खरबूजाने भरलेला ट्रॅक्टर शेताच्या बांधावर उभा करत गेल्या चार दिवसात तब्बल सव्वा लाखाची थेट विक्री केली आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विक्री करताना योग्य ती काळजी घेण्यात आली असल्याने मागणी वाढली आहे. 

सध्या जागतिक पातळीवर कोरोनाचे संकट लक्षात घेता शेतकऱ्यांना विक्रीसाठी अडचणी निर्माण होत आहेत. सध्या शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झालेली आहे. त्यासाठी शहरातील व गावातील लोकांनी शेतातच खरेदी करून सहकार्य करावे. यामुळे गर्दी होणार नाही आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागेवरच बाजारपेठ मिळेल.

त्यासाठी खेडे गावातील व शहरातील 
ग्राहकांनी फळे व भाजी विक्री स्टॉलवरून गर्दी न करता थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आवश्यक गोष्टी खरेदी केल्या तर दोघांचीही गरज भागेल. यातून शासनाच्या आदेशाचे पालनही होईल. ग्राहकांना ताजा फळे, भाजीपाला मिळून शेतकऱ्याला चार पैसे अधिक मिळतील. 

श्री. वरे म्हणाले, की शेतातील कलिंगड, खरबूज या फळांची मळद, निरावागज रोडवर मंगळवारपासून (ता.२३) कुठलीही गर्दी न करता विक्री व्यवस्था केली आहे. विक्रीसाठी प्रशांत वरे, हनुमंत वरे, रोहित अहिवळे यांचे पाठबळ मिळाले. पुणे, मुंबई येथे विक्रीसाठी उत्पादन घेतले होते. मात्र, कोरोनामुळे सर्वच बंद झाल्याने नुकसान होण्याची वेळ आली होती.

त्यातून जाग्यावरच विक्री करण्याचे निर्णय घेतला. स्टॉलवर खरेदीसाठी बारामती नगरपालिकेचे नगरसेवक सुधीर पानसरे, बाळासाहेब जाधव, उपनगराध्यक्ष बिरजु मांढरे, कृषी अधिकारी बाळासाहेब देवकाते अशा अनेक व्यक्तींनी येऊन सुरक्षित अंतर ठेवुन खरेदी केली. जेणेकरून सरकारच्या निर्णयामध्ये आपलाही मोलाचा वाटा ठरून शेतकरी व ग्राहक या दोघांचाही फायदा होऊ शकतो. 

सध्या शेतामध्ये एका खाजगी कंपनीचे सुमारे सहा एकरावर विविध रंग असलेल्या कलिंगड व खरबूजाची लागवड केली आहे. हे कलिंगड रंगीत असून गर पिवळा आहे. तर खरबूज वरून गर्द पिवळे व गर पांढरा असल्याने चवीला गोड आहे. त्यामुळे ग्राहकांची मागणी चांगली आहे. विक्री केली नसती तर एकरी जवळपास सव्वा लाखाचे नुकसान झाले असते. मात्र, आता गावोगावातील शेतकरी खरेदीसाठी येऊ लागले आहेत, असेही ते म्हणाले. 

विक्री करताना आलेले अनुभव 

  • कोरोनामुळे नुकसान होण्याची भिती जास्त होती 
  • शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ न देता विक्री व्यवस्था सुरू केली 
  • विक्रीसाठी सोशल मिडीयाची मोठी मदत झाली 
  • शेतातच विक्री व्यवस्था सुरू केल्याने नुकसान टळले 
     

इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...