Agriculture news in marathi Watershed of dams Rainy season in the area | Page 2 ||| Agrowon

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची उसंत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 जून 2021

पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीकांमाना सुरूवात झाली असली तरी आता दोन दिवसांपासून काहीशी उसंत घेतल्याचे चित्र आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीकांमाना सुरूवात झाली असली तरी आता दोन दिवसांपासून काहीशी उसंत घेतल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडत असल्याने भात पिकांच्या रोपांसाठी हा पाऊस पोषक असल्याची स्थिती आहे.

महिन्यापासून जिल्ह्यात पूर्वमोसमी पावसाच्या चांगल्याच सरी कोसळत होत्या. त्यानंतर पाच जून रोजी मॉन्सून राज्यात दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विशेषतः हा पश्चिमेकडील असलेल्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या संततधार सरी बरसत होत्या.  सध्या होत असलेल्या पावसामुळे भात खाचरामध्ये पाणीसाठा होत असल्याने भात रोपे तरारली आहे.

जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४ मिलिमीटर पाऊस पडला. वडीवळे, वरसगाव दहा, मुळशी, पानशेत अकरा, टेमघर सहा, खडकवासला पाच, निरादेवधर तीन,  पवना, कळमोडी दोन, नाझरे, डिंभे एक मिलिमीटर पाऊस पडला. तर वीर, भाटघर, चिल्हेवाडी, पिपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, घोड, विसापूर, चासकमान, कासारसाई या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडला नसल्याची नोंदही जलसंपदा विभागाकडे झाली आहे.
 
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 
एक ते १४ जून या कालावधीत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

पिंपळगाव जोगे ७३, माणिकडोह ५३, येडगाव ४४, वडज ५१, डिभे ८४, घोड १२३, विसापूर ३८, कळमोडी ६७, चासकमान १३५, भामा आसखेड ६७, वडीवळे ११३, आंध्रा २११, पवना १४६, कासारसाई १२२, मुळशी ७४, टेमघर १०५, वरसगाव १२०, पानशेत ११७, खडकवासला ८५, गुंजवणी १०७, नीरा देवधर ७६, भाटघर ५९, वीर १०३, नाझरे ५०,उजनी ७३ आणि चिल्हेवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १४ मिलिमीटर पाऊस झाला.


इतर ताज्या घडामोडी
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...