Agriculture news in marathi; Watershed in Khandesh; Waiting for rain | Agrowon

खानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची प्रतीक्षा कायम
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

जळगाव  ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही दमदार किंवा पूर्वमशागत योग्य पूर्वमोसमी पाऊस झालेला नाही. शिवार पेरणीसाठी तयार आहे. परंतु, पावसाचे कुठलेही संकेत, वातावरण नसल्याने शेतकरीराजा चिंताग्रस्त झाला आहे. 

जळगाव  ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही दमदार किंवा पूर्वमशागत योग्य पूर्वमोसमी पाऊस झालेला नाही. शिवार पेरणीसाठी तयार आहे. परंतु, पावसाचे कुठलेही संकेत, वातावरण नसल्याने शेतकरीराजा चिंताग्रस्त झाला आहे. 

मागील वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. नंतर पावसाने हूल दिली होती. या वर्षी मात्र एकदाही पाऊस झालेला नाही. १ ते ११ जूनदरम्यान खानदेशात धुळे, साक्री, शिंदखेडा, जळगाव जिल्ह्यांतील चोपडा, जळगाव, यावल, पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, रावेर या भागांत वादळी पाऊस झाला. यात वादळ अधिक व पाऊस मध्यम स्वरूपाचा होता. शिवाराला या पावसाचा फारसा लाभ झाला नाही. तसेच मे महिन्यात कमाल तापमान ४८ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले होते. सुमारे १२ दिवस कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. तर जूनमध्येदेखील १० दिवस कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत आहे. अतिउष्णतेमुळे केळी व भाजीपाला, पपई पिकाला फटका बसण्याचे सत्र कायम आहे.

दमदार पाऊस झाला असता दर पिकांच्या सिंचनाची फारशी गरज राहिली नसती. तसेच पेरणीपूर्व मशागत सुरू झाली असती. परंतु, दमदार पाऊस न झाल्याने शेतशिवार उजाड दिसत आहे. शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टरच्या साह्याने नांगरणी, शेत भुसभुशीत करण्याचे काम उरकून घेतले आहे. पावसाचे कोणतेही वातावरण नसल्याने बियाण्याची खरेदी मात्र शेतकरी करीत नसल्याची स्थिती आहे. कारण पावसावरच पेरणीचे गणित अवलंबून आहे. कापूस लागवड १० जुलैपूर्वी झाल्यास पीक बऱ्यापैकी येते.

सोयाबीनची पेरणीदेखील १५ जुलैपर्यंत करायची असते. खानदेशात या हंगामात सुमारे आठ लाख हेक्‍टरवर कापूस लागवड अपेक्षित आहे. पाऊस जसजसा लांबणीवर पडेल, तसे पेरणीचे गणितही बदलेल.  बाजारात बियाणे मुबलक आहे, परंतु खरेदी कुठेही सुरू नाही. कमाल शेती कोरडवाहू असल्याने बियाणे बाजारातील उलाढाल जवळपास ठप्प असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...