Agriculture news in marathi 'Watery Shivar' should be implemented through mass movement: Dr. Rajendra Singh | Agrowon

'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून राबवावी : जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात ठेकेदारामार्फत ही योजना राबविल्याने यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. परंतु, आता शासनाने ही योजनाच बंद करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. शासनाने सामुदायिक चळवळीच्या माध्यमातून ही योजना चालू ठेवावी,’ असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. मात्र, शेवटच्या टप्प्यात ठेकेदारामार्फत ही योजना राबविल्याने यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. परंतु, आता शासनाने ही योजनाच बंद करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. शासनाने सामुदायिक चळवळीच्या माध्यमातून ही योजना चालू ठेवावी,’ असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

जलसंपदा विभागातर्फे आयोजित कार्यशाळेसाठी ते जळगावात आले होते. जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात बुधवारी (ता. २२) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, जलयुक्त शिवार ही चांगली योजना आहे. सुरुवातीच्या काळात ती प्रभावीपणे राबविण्यात आली. मात्र, शेवटच्या टप्प्यात ही योजना मक्तेदारामार्फत राबविण्यात आल्याने त्यात भ्रष्टाचार झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी ही योजना केवळ कागदावरच राहिली.  राज्यातील नवीन शासनाने ही योजनाच बंद करण्याचे पाऊल उचलले ते चुकीचे आहे. शासनाने यात काही सुधारणा करून सामुदायिक चळवळीतून योजना राबविण्याची गरज आहे. 

मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत देशात गंगा सफाई योजना राबविली. त्याबाबत ते म्हणाले, केंद्र सरकारने गंगा सफाईवर केलेला २० कोटींचा खर्च वाया गेला आहे. ही योजना चुकीच्या पद्धतीने राबविली आहे. त्यांनी केवळ घाट बांधण्यावरच खर्च केला. नैसर्गिक स्रोतातून गंगा नदी वाहती करण्याची गरज असताना, त्यावर घाट बांधले. शिवाय, नदीवर बांधही घालण्यात आले आहेत. केंद्र शासनाने आम्हाला आश्‍वासन दिले होते, की गंगा नदीचा फ्लो नैसर्गिक पद्धतीने ठेवण्यात येईल; परंतु ते आश्‍वासन पाळले नाही. त्यामुळे साध्वी पद्मावती यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याचा आज ३९ वा दिवस आहे. गंगा नैसर्गिक पद्धतीने वाहिली पाहिजे, यासाठी देशात आगामी काळात मोठे आंदोलन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

पीक पद्धती बदलण्याची गरज
आगामी काळात जगात पाण्यासाठी युद्ध होणार असल्याचे स्पष्ट करून डॉ. राजेंद्रसिंह यांनी सांगितले, तिसरे युद्ध हे पाण्यासाठी तहानलेली राष्ट्रे आणि पाणी समृद्धीची पॉवर ज्यांच्याकडे अशी राष्ट्रे यांच्यात होणार आहे. भारतातही पाण्याची समस्या बिकट होणार आहे. त्यामुळे अद्यापही वेळ आहे. त्यामुळे हवामानावर आधारित पिके घेण्याची गरज आहे. सामुदायिक पद्धतीने शेती करण्याची गरज आहे.  

 


इतर बातम्या
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...
मराठवाड्यात यंदा तुती लागवडीसाठी...औरंगाबाद : मराठवाड्यात गतवर्षी दुष्काळाचा...
संपूर्ण कर्जमुक्तीसाठी भाजपचे आंदोलन अकोला  : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने...
`म्हैसाळ`च्या उन्हाळी आवर्तनाकडे...सलगरे, जि. सांगली : म्हैसाळ पाणी योजनेचे कालवे...
अकोला झेडपी देणार आत्महत्याग्रस्त...अकोला  ः नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात...
लातूर विभागात १४ लाख हेक्‍टरवर रब्बी...लातूर : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत...
अमरावती जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुलअमरावती  ः जिल्ह्यात एप्रिल ते जून या...
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
वऱ्हाडातील चार लाख शेतकरी...अकोला  ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या...
मराठवाडा, खानदेशातील नऊ कारखान्यांची...औरंगाबाद  : येथील साखर सहसंचालक...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ३३११...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
जळगाव : कर्जमाफीसाठी ११३ शेतकऱ्यांचे...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कराडी येथे रेंजअभावी कर्जमाफी लाभार्थी...पारोळा, जि. जळगाव ः राज्य सरकारच्या महात्मा...