agriculture news in marathi wave two years interest on farmers loan : Sainath Ghorpade | Page 2 ||| Agrowon

'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करा'

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 मे 2020

लॉकडाउनच्या काळात सर्वच व्यवसाय बंद होते. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे दोन वर्षांपर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ करावे : साईनाथ घोरपडे

नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाउनच्या काळात सर्वच व्यवसाय बंद होते. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे दोन वर्षांपर्यंतच्या कर्जावरील व्याज माफ करावे, अशी मागणी स्वराज्य रक्षक संघर्ष समितीचे समन्वयक साईनाथ घोरपडे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात घोरपडे यांनी म्हटले आहे, की आजही मोठ्या प्रमाणावर उद्योग- व्यवसाय सुरू झालेले नाहीत. कोरोना संकटाच्या काळात सर्वांत जास्त नुकसान शेतकऱ्यांचे झाले. बाजार समित्या बंद असल्यामुळे अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले. शेतमाल तसाच शेतात सडून गेला. अशा स्थितीत, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे, त्यांना रक्कम भरणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे दोन वर्षांपर्यंतचे कर्जावरील व्याज माफ करावे. कांद्यालाही हमी भाव द्यावा. शेतमजूर, बांधकाम कामगारांसाख्या अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशांना जेवणाची व्यवस्था करावी. सुशिक्षित बेरोजगारांना प्रतिमहिना दीड हजार रुपये भत्ता द्यावा. शहरी भागातील मध्यमवर्गीय नागरिकांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे आणि एका वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी. तसेच, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे सहा महिन्यांपर्यंतचे वीजबिल माफ करावे, तसेच त्यांना पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे. 


इतर बातम्या
सीईटीऐवजी गुणांद्वारे कृषी...अमरावती ः बारावीनंतर कृषी अभ्यासक्रमाला...
वीजबिले माफ न केल्यास कंपनीचे कार्यालय...बुलडाणा ः लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्यांचे...
सत्तास्थापनेसाठी भाजपकडूनच विचारणा केली...मुंबई : सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तास्थापन...
वऱ्हाडात दूधाचे दर स्थिरअकोला ः या भागातील दूध संघ डबघाईस आल्याने दूध...
वाशीम जिल्ह्यावर खरिपात पावसाची कृपावाशीम ः जिल्ह्यात यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत...
वर्धा जिल्ह्यात दूध उत्पादकांना दराचा...नागपूर ः लॉकडाउनमुळे मागणी घटल्याचे सांगत खासगी...
नाशिकमध्ये कमी दूध दरामुळे उत्पादकांची...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार...
वीज बिले माफ न केल्यास उद्रेक ः...नाशिक : लॉकडाऊन काळात वीज कंपन्यांनी घरगुती वीज...
एचटीबीटी कपाशीची शेतकऱ्यांकडून पाहणीअकोला ः शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे...
दुर्मीळ निलमणी आमरीचे सातपुड्यात...जळगाव ः जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा या अनेक...
दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान...इस्लामपूर, जि. सांगली ः कोरोना सारख्या साथीत...
भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश;तरीही चार...पुणे: पंतप्रधान पॅकेजमधून राबविण्यात आलेल्या...
अकोला जिल्ह्यात सोयाबीन उगवणशक्तीबाबत...अकोला ः  सोयाबीन पिकाची पेरणी जुलैच्या...
अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी २७ कोटीपुणे: राज्यातील अन्नधान्य पिकांच्या योजनांसाठी...
ग्लायफोसेट वापराच्या मसुद्याविरुद्ध दाद...पुणे: केंद्र सरकारने ग्लायफोसेट तणनाशकाच्या...
सोयाबीन बियाणे कंपन्यांवर राज्यात ४६...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची...
दूध व्यवसाय झाला आतबट्ट्याचा; शेतकरी...पुणेः मागील काही वर्षांपासून संकटात असलेल्या दूध...
राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता पुणे : मॉन्सून सक्रिय होण्याचा पोषक हवामान होत...
विश्वजित माने प्रभारी कृषी आयुक्तपुणे : राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची...
कोल्हापुरात आज घरगुती वीज बिलांची होळी ...कोल्हापूर  : दिल्ली सरकारने शंभर...