तासगाव पश्‍चिम भागातील द्राक्ष हंगाम संपण्याच्‍या मार्गावर

तासगाव पश्‍चिम भागातील द्राक्ष हंगाम संपण्याच्‍या मार्गावर
तासगाव पश्‍चिम भागातील द्राक्ष हंगाम संपण्याच्‍या मार्गावर

येळावी, जि. सांगली  : तासगाव पश्‍चिम भागात येळावी, निमणी, तुरची परिसरातील यंदाचा द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. या वर्षी द्राक्षाला द्राक्ष प्रतीनुसार पावणेदोनशे ते साडेतीनशे रुपये प्रतिपेटी असा दर मिळाला. त्यामुळे द्राक्ष बागायातादारांतून समाधान व्यक्त होत आहे.

तासगाव पश्‍चिम भागात निमणी. तुरची, नेहरूनगर, येळावी व नागाव परिसरांत द्राक्ष बागाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरातून दरवर्षी आगाप छाटणी घेऊन निर्यातक्षम द्राक्षे पिकवली जातात. मात्र यंदा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातच संततधार पाऊस व ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे अनेक द्राक्ष बागायतदारांनी आगाप फळछाटणी घेण्याचे धाडस केले नाही. मात्र ज्या द्राक्ष बागायतदारांनी धाडसाने याच महिन्यात आगाप फळछाटणी घेतली, अशा द्राक्ष बागांची द्राक्षे प्रारंभी सुमारे साडेतीनशे रुपये पेटी या दराने विकली गेली. वेगवेगळ्या द्राक्षांना वेगवेगळे दर मिळाले.

  प्रामुख्याने तास- ए गणेश, सुपर सोनाका व शरद या द्राक्षांना पावणेदोनशे ते चारशे रुपये प्रतीपेटी दर मिळाला. नंतर मध्यंतरी जानेवारीच्या थंडीच्या दिवसांत द्राक्ष मागणीत घट झाली. त्यामुळे द्राक्ष दर कमी झाल्याने द्राक्ष बागायतदार हवालदिल झाला.  हंगामाच्या अंतिम टप्प्यात मात्र सध्या परिस्थितीत तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत द्राक्ष मागणीत वाढ झाली आहे. परिणामी, द्राक्ष दरातही वाढ होऊ लागल्याचे चित्र आहे. 

अजूनही २५ टक्के बागा निर्यातक्षम द्राक्षास सुमारे ५० ते ७० रुपये प्रतिकिलो, तर देशांतर्गत मुंबई, बंगळूर, चेन्नई, जयपूर, दिल्ली या ठिकाणी पाठविल्या जाणाऱ्या द्राक्षास ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. त्यामुळे द्राक्ष बागायातादारांत समाधान आहे. परिसरातील यंदाचा ७५ टक्के द्राक्ष हंगाम पूर्ण झाला आहे. परंतु येळावी ते पलूस टप्प्यात मागास फळ छाटणी केल्याने अद्यापही २५ टक्के द्राक्ष बागा शिल्लक असल्याची माहिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com