Agriculture news in marathi On the way to harvest crops due to power outage in Shirur taluka | Page 2 ||| Agrowon

शिरूर तालुक्यात वीजजोड तोडल्याने पिके करपण्याच्या मार्गावर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021

पुणे : महावितरणने वीजबिल वसुलीसाठी वीजजोड तोडण्याची मोहीम हाती घेतली. यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. अनेक ठिकाणी खरीप पेरण्या, कांदा लागवडी खोळंबल्या आहेत.

पुणे : महावितरणने वीजबिल वसुलीसाठी वीजजोड तोडण्याची मोहीम हाती घेतली. यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. अनेक ठिकाणी खरीप पेरण्या, कांदा लागवडी खोळंबल्या आहेत. पिकांना कसे पाणी द्यायचे? पिके कशी जगवायची? पैसेच नसल्याने बिले कशी भरायची, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे.

शिरूरच्या पूर्व भागात घोड तसेच भीमा नदीमुळे हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. या परिसरात फळबागांबरोबर मोठ्या प्रमाणात तरकारीदेखील घेतली जाते. सध्या कांदा लागवड सुरू आहे. काही ठिकाणी लागवडीनंतर पिकांना पाणी देण्याची गरज आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात कांद्याची रोपे शेतकऱ्यांच्या शेतात आहेत. कांद्याच्या रोपांना दोन दिवसांना पाणी द्यावे लागते. अशा स्थितीत शेती पंपांची वीज तोडल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्‍न आहे. कांदा रोपे करपण्याची शक्यता आहे. 

मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वी महावितरणने शेतकऱ्यांकडून काही प्रमाणात वीजबिल वसुली केली आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांकडे वीजबिलाची थकबाकी आहे. त्यातच कोरोना, शेतीमालाचे ढासळलेले भाव, यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. राज्यातील सत्ता बदलानंतर वीजबिलात सवलत मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी वीजबिले भरली नाहीत. आदीमुळे थकबाकीत वाढ झाली.

रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित

सध्या या भागात अनेक शेतकऱ्यांनी पिके घेण्यासाठी कर्जे घेतली आहेत. बाजारभाव चांगला मिळत असल्याने पुन्हा कांदा लागवडी सुरू केल्या आहेत. यातून दोन पैसे मिळतील, अनेकांची देणी भागवू, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. तीन महिन्यांपूर्वी वीजबिलाचा पहिला हप्ता भरला आहे, तसेच दोन व तीन हप्ते भरणे बाकी आहे. अशा शेतकऱ्यांचे विद्युत पंप बंद केले जात आहेत. रोहित्रावर थकबाकीदार जास्त असतील, तर पूर्ण रोहित्राचा विद्युतपुरवठा खंडित केला जात आहे.


इतर बातम्या
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...