शेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ मिळाले, की महिला देखील शेतीमध्ये वेगळेपण
बातम्या
आम्ही 'कोरोना मुक्त' झालो, इतर रुग्णही बरे होतील...! 'कोरोना'मुक्त दाम्पत्याचा अनुभव
पुणे: ‘‘आम्ही कोरोनापासून मुक्त झालो आहोत. इतर रुग्णही बरे होतील याची खात्री आहे,' असा विश्वास कोरोना मुक्त झालेल्या पहिल्या दांपत्याने व्यक्त केला आहे.
पुणे: ‘‘आम्ही कोरोनापासून मुक्त झालो आहोत. इतर रुग्णही बरे होतील याची खात्री आहे. मात्र, त्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व इतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्या सूचना करतात, त्यांचं पालन केलं तर आपण ह्या रोगाला हरवू शकतो,' असा विश्वास कोरोना मुक्त झालेल्या पहिल्या दांपत्याने व्यक्त केला आहे. नायडू रुग्णालयातील आरोग्य सेवेचं कौतुक करतानाच अशीच सेवा सर्वांना मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. कोरोना मुक्त झालेल्या दांपत्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांनी आपल्या अनुभवाचे पत्र समाजमाध्यमावर पाठवले आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर (बुधवारी) घरी परतलेल्या या दाम्पत्यानं नायडू रुग्णालयाच्या सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानणारे पत्र लिहिले असून हे पत्र समाजमाध्यमांवर पाठविले आहे. यातून राज्यातील जनतेसाठीही एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.
आपल्या पत्रात ते लिहितात,‘‘३ मार्च रोजी आम्ही आरोग्य तपासणीसाठी नायडू रुग्णालयात दाखल झालो. चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आमच्यावर उपचार सुरू करण्यात आले. रुग्णालयात दाखल झाल्यापासून आम्ही डॉक्टरांच्या सूचनांचे व रुग्णालयाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले. तब्बल १४ दिवस उपचार झाल्यावर १५ व्या व १६ व्या दिवशी आमची पुन्हा चाचणी घेण्यात आली. ती निगेटिव्ह आल्यानं आम्हांला आज घरी सोडण्यात आलंय.’’
या दांपत्याला डिस्चार्ज देताना सर्व डॉक्टर, परिचारिका, शासकीय अधिकारी यांनी रुग्णालयातून रुग्णवाहिका बाहेर पडताना दुतर्फा थांबवून टाळ्या वाजवत त्यांना शुभेच्छा दिल्या, तेव्हा परिसर एका नव्या उर्जेने भारावून गेला होता.
- 1 of 1494
- ››