अकोला : आम्हाला काहीही नको; प्यायला पाणी द्या

आम्हाला काहीही नको; प्यायला पाणी द्या
आम्हाला काहीही नको; प्यायला पाणी द्या

अकोला : लोकसभा निवडणूक प्रचारात स्थानिक मुद्द्यांना बगल मिळाली आहे. पाणीटंचाई, दुष्काळ, शेतीचे प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाही. जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात मार्चपासूनच पाणीप्रश्न पेटला आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार वेगाने होत आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकी, भेटीवेळी नागरिकांनी खासकरून महिलांनी ‘पाणी द्या बाकी, काही नको’ अशी मागणी केली.

गांधीग्राम या पूर्णा नदीकाठावरील गाव पाणीप्रश्नाला कंटाळले आहे. त्यामुळे या गावाने लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा दिला आहे. या गावातील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते पाण्याच्या प्रश्नांवर एकत्र आले आहेत. पाण्यासाठी नागरिकांना सध्या भरउन्हात भटकंती करावी लागते आहे. गेल्या महिनाभरापासून ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावकऱ्यांमध्ये दररोज रोष वाढतो आहे. मात्र, लोकसभेच्या रणधुमाळीत या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. 

गेल्या महिन्याभरापासून नळाला पाणी न आल्याने या ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. यामुळे रोगराई वाढत आहे. सध्या नागरिकांची तहान विकतच्या पाण्यावर भागत आहे. परिसरात महिन्याभरापासून पाणी नसल्याने मोठ्यांसह चिमुकल्यांची भटकंती होत आहे. या भागात पाण्याची दुसरी कोणतीही व्यवस्था नसल्याने ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी विकत घेत आहेत. 

गांधीग्राम परिसरात पाण्यासाठी नागरिकांना दरवर्षी तोंड द्यावे लागते. या गावापासून काही अंतरावर पूर्णा नदीवर नेर-धामणा प्रकल्प केला जात आहे. त्याचे काम पूर्ण झाले असते, तर या भागात पाणी समस्या उद्भवली नसती, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

दहा गावांत पाण्यासाठी संताप गांधीग्राम या गावाप्रमाणेच गोपालखेड, निराट, वैराट, राजापूर,धामणा, मंडळा, दुधाला, लोणाग्रा, गोत्रा, पाळोदी ही गावेसुद्धा तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. या नागरिकांना मतदानाच्या बदल्यात केवळ प्यायचे पाणी हवे असून, त्यासाठी त्यांच्यामध्ये संताप आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com