`आमी आमची शेतातली काम करतच हाव'...

काबाडकष्ट करून भाजीपाला, फळे पिकवत हाव. पण, काईजनांचा माल शेतातच सडून गेला. अन्, काईंना तर दीडदमडीचा भाव मिळाला.. खर्च बी निघाला न्हाय बघा. व्यापाऱ्याचीच घर भरली. नुकसान झाल तरी आम्ही अजून हिंमत सोडली न्हाय. - बाबुराव कासले, शेतकरी.
We doing to work in our farms' ...
We doing to work in our farms' ...

चापोली. जि. लातूर ः ‘‘सध्या लोकांसांठी चिंता लागून राहिली हाय, की आम्हाला घराबाहेर फिरायला कधी मिळल. कधी हा कोरोना जाईल... आमासनी बी याची चिंता हाय, पण... पुढील हंगामात चांगला पाऊस पडल का, बियानं खतं येळेवर मिळल का, चांगल पीक येईल का, चांगला भाव मिळल का? याचाबी घोर लागलाय. हीच चिंता डोक्यात घेऊन आमी आमची शेतातली काम करतच हाव,’’ अशी प्रतिक्रिया चापोली येथील नरसिंग बडगिरे या शेतकऱ्याने दिली. 

टाळेबंदीमुळे लहान, मोठे उद्योग-धंदे ठप्प झाले आहेत. मोठे वेतन घेणारे घरातूनच काम करताहेत. मात्र, जगाचा पोशिंदा बळीराजा आजही दिवसरात्र आपल्या शेतात राबताना दिसत आहे. जर, इतरांसारखे शेतकरी घरातच बसला, तर जगाचं पोट कस भरणार, असा प्रश्‍न येथील शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

शंकरवाडी येथील शेतकरी ज्ञानोबा कोले म्हणाले, ‘‘ कोरोनामुळे नोकरीची मानसं घरातच बसलीयात. आम्ही पिकवलेला भाजीपाला इकत घेऊन खात्यात. जर, आमिबी घरातच बसलो, तर ही शहरातली माणसं काय खातील. आम्हाला कुठ नोकरादारासारख सुट्टी असते बाबा. आमचं बारामहिनं राबावचं लागतं. तवा कुठं लोकासनी पोठभर खायला मिळतं.  शतकरीच देशाचा कणा 

आज देश थांबला आहे. पण, शेतकरी मात्र थांबला नाही. देशाचा खरा कणा हा शेती आहे. त्यामुळे शेतकऱ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या पोस्ट फेसबुक, व्हाटसॲप, ट्विटरवर वायरल होत आहेत. त्याला चांगल्या प्रतिक्रियाही मिळत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com