agriculture news in Marathi we dont want black laws Maharashtra | Page 3 ||| Agrowon

केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला गरज नाही : महिला शेतकरी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या काळ्या कायद्याची आम्हाला गरज नाही, हमीभावाची कायद्याने हमी द्यावी, अत्यावश्‍यक सुधारणा कायद्याने साठेबाजी आणि काळ्या बाजाराला प्रोत्साहन मिळणार असल्याने रद्द करावा.

नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या काळ्या कायद्याची आम्हाला गरज नाही, हमीभावाची कायद्याने हमी द्यावी, अत्यावश्‍यक सुधारणा कायद्याने साठेबाजी आणि काळ्या बाजाराला प्रोत्साहन मिळणार असल्याने रद्द करावा, अशा मागण्या सोमवारी (ता.२६) महिला शेतकरी संसदेत करण्यात आल्या. 

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियानातील २०० महिलांनी येथील जंतर मंतरवर ‘शेतकरी संसद’ भरवली. सोमवारी शेतकरी संसदेत अत्यावश्‍यक वस्तू (सुधारणा) कायदा, २०२० आणि शेतीमालाला कायद्याने हमीभाव देण्यावर चर्चा करण्यात आली. शेतकरी संसदेचे सुभाषिनी अली यांनी संचलन केले. राष्ट्रगीताने संसदेला प्रारंभ झाला. त्यानंतर शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. 

‘‘आजच्या संसदेतून महिलांच्या सामर्थ्याची ओळख आहे. महिला या घरही चालवू शकतात आणि देशही, आज येथील सर्व जण राजकारणी आहोत. सरकार आपल्याला आतंकवादी, खलिस्तानी आदी नावांनी संबोधित आहे. परंतु त्यांच्यात हिंमत असले तर त्यांनी या आतंकवादी, खलिस्त्यांनी उत्पादित केलेले अन्न खाऊ नये,’’ असेही श्रीमती अली म्हणाल्या. 

शेतकरी नेत्या नीतू खन्ना यांनी हमीभावाची कायद्याने तरतूद करण्याची मागणी करत, ‘‘देशातील सर्वसामान्य शेतकरी हमीभाव नसल्याने संकटात आहे. त्यामुळे हमीभाव कायद्याने लागू करावा,’’ अशी मागणी केली. नीव किरण यांनी अत्यावश्‍यक कायदा महिला, गरीब आणि सामान्य माणसाच्या विरोध असल्याने रद्द करण्याची मागणी केली. ‘‘अत्यावश्‍यक सुधारणा कायद्यामुळे साठेबाजी आणि काळ्या बाजाराला प्रोत्साहन मिळणार आहे. लोकांच्या हे लक्षात का येत नाही की या कायद्यामुळे शेतकरी नाही तर सामान्य माणूस भरडला जाणार आहे. तसेच कायद्याच्या प्रक्रियेतून निर्माण न झालेल्या या काळ्या कायद्यांची आम्हाला आवश्‍यकता नाही,’’ असेही किरण म्हणाल्या. 

महिला शेतकरी संसदेतील मंजूर प्रस्ताव 

  • देशाच्या शेतीमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे, तरीही महिलांचा जे स्थान आणि सन्मान मिळायला पाहिजे तो देशात मिळत नाही. त्यांची मेहनत, कुशलता आणि प्रगतीला आंदोलन आणि समाजात योग्य दर्जा देणे आवश्‍यक आहे. शेतकरी आंदोलनात महिलांचे योगदान वाढविण्यासाठी विचारपूर्वक पावले उचलण्याची आवश्‍यक आहे. 
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्‍वभूमीवर संसद आणि विधानसभांमध्येही महिलांना ३३ टक्के प्रतिनिधित्व मिळावे. जवळपास ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी संविधानात सुधारणा करावी. 
     

इतर बातम्या
मराठवाड्यात नुकसानग्रस्त पिकांचे ६७.२६...औरंगाबाद : प्राथमिक अंदाजात जवळपास १५ लाख हेक्‍...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त...नांदेड : जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये...
जळगावातील धरणांत ८० टक्के उपयुक्त...जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या...
ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत...सातारा : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत,...
'लासलगाव'च्या कांद्याला टपाल पाकिटावर...नाशिक : कांदा पिकासाठी लासलगाव परिसराची राष्ट्रीय...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...