चांद्रयान मोहिमेसाठी निधी देणार ः अमरसिंह देशमुख

चांद्रयान मोहिमेसाठी निधी देणार ः अमरसिंह देशमुख
चांद्रयान मोहिमेसाठी निधी देणार ः अमरसिंह देशमुख

आटपाडी ः भारतीय अवकाश संशोधन संस्थेला या पुढच्या चांद्रयान मोहिमेसाठी बाबासाहेब देशमुख बॅंक आणि श्रीमंत बाबासाहेब देशमुख मिल्क प्रोड्यूसरकडून प्रत्येकी एक लाख, तर आटपाडी शिक्षण संस्थेकडून पन्नास हजार अशी एकूण अडीच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. तशी घोषणा बॅंकेचे संस्थापक अमरसिंह देशमुख यांनी केली. 

तांबडा मारुती मंदिराच्या सभागृहात वार्षिक सभा झाली. बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब गायकवाड, बॅंकेचे अध्यक्ष दादासाहेब पाटील, उपाध्यक्ष जयंत देशपांडे, एम. डी. भगवंत आडमुठे, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण बालटे, दिग्विजय देशमुख उपस्थित होते. 

देशमुख म्हणाले, ‘‘चांद्रयान २ मोहीम अंतिम क्षणी चंद्रावर पोहोचण्यात अडचणी आल्या. पण सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रहितासाठी शास्त्रज्ञांना पुन्हा नवी उमेद मिळावी, यासाठी नव्या मोहिमेसाठी विविध संस्थांमार्फत मदत देण्याचा निर्णय घेतला. बॅंकेने सर्वांच्या सहकार्यातून यावर्षी ४१० कोटींचा व्यवसाय केला. हजार कोटीं व्यवसायाचे उद्दिष्ट आहे. एटीएम सेवा आजपासून सुरू केली.’’ 

अध्यक्ष पाटील म्हणाले, ‘‘बॅंकेमार्फत ग्रामीण आणि शहरी भागात चांगली सेवा दिली जात आहे. त्यामुळे दहा कोटी ठेवींची वाढ झाली.’’ 

कार्यकारी अधिकारी बी. एस. आडमुठे यांनी अहवाल वाचन केले. आर.के. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. काही पुरस्काराचेही वितरण केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com