मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणार

इथून पुढील काळात कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी एकत्र लढण्याचा निर्धार सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केला.
We will fight together for Maratha reservation
We will fight together for Maratha reservation

कोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी एकत्र लढण्याचा निर्धार सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी केला. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने बुधवारी (ता. १६) राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधिस्‍थळावर मूक आंदोलन झाले. ‘आम्‍ही बोललो, आता तुम्‍ही बोला’ असे सांगत सर्व लोकप्रतिनिधींना भूमिका मांडण्याचे आवाहन मराठा कार्यकर्त्यांनी केले होते. त्यानुसार हे आंदोलन झाले. या आंदोलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्‍थित होते. भर पावसात हे आंदोलन झाले.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, प्रकाश आंबेडकर, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार राजेश पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर या बैठकीस उपस्‍थित होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही काही काळ आंदोलनस्‍थळी उपस्‍थिती लावली. संभाजीराजे छत्रपती यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्यांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्‍न करणार असल्याचे सांगितले. 

सारथीचे सक्षमीकरण, जिल्‍हानिहाय शाखा, मराठा मुलांना मिळणाऱ्या शिष्‍यवृत्तीत वाढ करणे, अण्‍णासाहेब पाटील महामंडळाची जी कर्जमर्यादा आहे, त्यात वाढ करण्यासाठी सरकार सकारात्‍मक असल्याचे सर्वच लोकप्रतिनिधींनी सांगितले. या आंदोलनात बजरंग पाटील, धनंजय महाडिक, के. पी. पाटील, मालोजीराजे छत्रपती, अमल महाडिक, महेश जाधव, समरजितसिंह घाटगे, विश्‍‍वास पाटील आदींनी सहभाग घेतला.

पक्षांचा अजेंडा राबवू नका अनेक नेत्यांनी आपल्या राजकीय पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रयत्‍न केला. कोणत्या पक्षाची चूक झाली, कोणत्या सरकारविरोधात आंदोलन करणे आवश्यक आहे, हे सांगण्याचाही प्रयत्‍न केला. मात्र संयोजकांनी सर्वच लोकप्रतिनिधींना पक्षाचा अजेंडा न मांडण्याची सूचना केली.

मराठा आरक्षणासाठी नेमकेपणाने काय करणे गरजेचे आहे हे पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे दिलेल्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर पूर्तता करावी. शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास पुणे ते मुंबई मंत्रालय लाँग मार्च अटळ आहे. त्याची तयारी राज्यातील समन्वयकांबरोबर बैठक घेऊन करणार आहोत. - श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, खासदार 

संभाजीराजे यांनी घेतलेली भूमिका सकारात्मक असून, त्यांनी तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करावी. - सतेज पाटील, पालकमंत्री

मराठा आरक्षणासाठी केंद्राची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे केंद्राकडे पाठपुरावा करावा. - श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. गरीब मराठा समाज बांधवांसाठी आरक्षण मिळणे महत्त्वाचे आहे. आरक्षणासाठी वाटेल ती किंमत देऊ. - हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com