Agriculture News in Marathi We will help farmers as much as possible: Vishwajit Kadam | Agrowon

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू : विश्वजित कदम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 डिसेंबर 2021

गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडला. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांचे नुकान झाले आहे. तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिले. 

सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडला. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांचे नुकान झाले आहे. तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिले. 

सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले. त्यापार्श्वभूमीवर नुकसान झालेल्या बांगाची पाहणी सोमवारी (ता. ६) सोनी (ता. मिरज) येथे कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केली.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी, तर तासगाव तालुक्यातील मणेराजुरी या गावातील बाधित झालेल्या द्राक्षाची पाहणी केली. या वेळी कृषी आयुक्त धीरजकुमार, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी मनोज वेताळ, दिनकर पाटील, जीवन पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले, ‘‘गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाच्या माहामारीला सामोरे जात आहोत. या काळातही शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यातच गेल्या वर्षभरात अवकाळी पावसामुळे शेतीचे आणि पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा हात म्हणून निधी उपलब्ध करून दिला आहे.’’ 

डिसेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे नवीन अडचणी सरकार समोर आल्या आहेत. परंतु त्या अडचणीवर मात करण्यासाठी सरकार सक्षम आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकार मदत करेलच. आवश्यकता पडली तर केंद्र सरकारकडून मदत घेऊन शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे काम सरकार करेल. सध्या झालेल्या पावसामुळे पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य स्तरावर मंत्रिमंडळाची चर्चा करून जास्तीत जास्त मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेऊ,असेही कदम म्हणाले.


इतर बातम्या
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
युपी काँग्रेसची घोषणा : कर्जमाफी, गहू-...वृत्तसेवा - उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यास...
मराठवाड्यातील पाणीसाठा ८५ टक्‍क्‍यांवर औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमधील...
कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या...बुलडाणा : ‘‘कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या...
ग्रामपंचायतीचे शंभर टक्के कर भरल्यास...पुणे : थकीत कर वसुलीसाठी मावळ तालुक्यातील घोणशेत...
अमरावती : पोलिस अधिकाऱ्याच्या...अमरावती ः भारतीय पोलिस सेवेत असलेल्या एका युवा...
पंढरपुरातील विकासकामे दर्जेदार व्हावीत...सोलापूर ः पंढरपुरात वारीनिमित्त लाखो भाविक येतात...
अमरावती विभागात १५ हजार हेक्‍टर पिकांचे...अमरावती ः खरिपानंतर रब्बी हंगामातील पिकांनादेखील...
कोल्हापुरातील १६, तर सांगलीतील चार...कोल्हापूर : कृषी ग्राहकांची चालू व थकीत...
जळगावमधील १७५ गावांमध्ये पाणी योजना...जळगाव : जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणीप्रश्‍न...
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...