agriculture news in marathi We will win the war against Corona : CM Uddhav Thackarey | Agrowon

हे युद्ध आपल्याला जिंकायचेच आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 26 मार्च 2020

मुंबई  : हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कोरोनाविरुद्धची लढाई सुरूचं ठेवू, हे युद्ध आपल्याला जिंकायचेच आहे. गुढीपाडव्याला महाराष्ट्रात बहर येते, परंतु हे युद्ध जिंकल्यानंतर पुन्हा आनंदाने गुढीपाडवा साजरा करू, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला.

मुंबई  : हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कोरोनाविरुद्धची लढाई सुरूचं ठेवू, हे युद्ध आपल्याला जिंकायचेच आहे. गुढीपाडव्याला महाराष्ट्रात बहर येते, परंतु हे युद्ध जिंकल्यानंतर पुन्हा आनंदाने गुढीपाडवा साजरा करू, असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला. तसेच कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू बंद होणार नाहीत, त्यामुळे साठा करू नका, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी गुढीपाडव्या निमित्ताने जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गप्पा मारल्या. सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, आज मी तुम्हाला निगेटिव्ह काहीच सांगण्यासाठी आलेलो नाही, मी केवळ शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे.मंगळवारी रात्री थोडी धावपळ झाली, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी गप्पा सुरू केल्या.

एकूणच सर्वांना कोरोना व्हायरसच्या गांभीर्याची कल्पना आली आहे. घराबाहेर पडू नका. या संकटाची तुलना मी जागतिक युद्धाशी केली आहे. १९७१चे युद्ध आपण लक्षात ठेवले पाहिजे. शत्रू दिसत नसल्याने हल्ला कुठून होईल माहीत नसते. म्हणून आपण घरात राहिले पाहिजे. घरातून बाहेर पडलो की शत्रू घरात येईल, असे मुख्यमंत्री  ठाकरे यांनी सांगितले.

कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू, प्राण्यांचे खाद्यपदार्थांचा साठा करू नका, रुग्णालये, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालूच राहतील. ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांची काळजी घेऊ, उद्योजक स्वतःहून पुढे येत आहेत. कंपनी, कारखाने बंद आहेत, त्या उद्योजकांना हातावरचे पोट असणाऱ्यांचे किमान वेतन कापू नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.
 


इतर बातम्या
राज्यात २३ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटपमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या...
दुधासाठीचा हमीभाव आम्हाला लागू नाही;...पुणे : राज्यातील जादा दूध खरेदी अनुदान योजना फक्त...
कोरोनाच्या जनुकीय आराखड्यासाठी प्रयत्न...नवी दिल्ली : ‘कोविड -१९' (कोरोना) विषाणूचा जनुकीय...
...अन् तामिळनाडूत महाराष्ट्रातील ऊसतोड...नवी दिल्ली : पोटाची खळगी भरण्यासाठी थेट...
‘लॉकडाउन’मध्ये कमाल... शेतकऱ्याच्या...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : लॉकडाउन न सारच थांबल......
हापूसची १०५ टन निर्यातरत्नागिरी ः हापूसच्या निर्यातीला चालना देण्यासाठी...
कोठारी ग्रुपतर्फे पंधरा लाखांचा मदत...सोलापूर ः कोरोना संकटात प्रशासनाला मदत व्हावी,...
यूपीएल लिमिटेडकडून पंतप्रधान मदत निधीला...पुणे : भारतातील सर्वात मोठी पीक संरक्षण...
मदतीच्या झऱ्याने ओलावले शिवार; अतिरिक्त...कोल्हापूर: दररोज निघणारा व बाजारपेठेत उठाव...
कृषीशास्त्रज्ञांचा व्हिडीओ...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
वरूडमध्ये ‘कोरोना’मुळे बागांतील...जालना : जवळपास दीडशे एकरवर विस्तारलेल्या...
वर्धा जिल्ह्यात दूध, भाजीपाल्यावर आयात...वर्धा ः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ‘कोरोना’...
राज्यात कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी वर्धा ः शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याबाबत सीसीआय...
हरभरा, तूर विक्रीसाठी गावातच नोंदणीची...अर्धापूर, जि. नांदेड : ‘‘‘कोरोना’च्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८५ व्यक्ती ‘होम...सिंधुदुर्ग : ‘‘‘होम क्वारंटाईन’ केलेल्या ८५...
घरातील कापूस खरेदी करा, महिला...परभणी : उन्हाळा सुरु झाला आहे. तापमानात वाढ...
सोलापुरात १२७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह सोलापूर : ‘कोरोना’चे संशयित असलेल्या जिल्ह्यातील...
‘उजनी’तून सोडले सोलापूरसाठी पाणी सोलापूर : सोलापूर शहरातील लोकांना पिण्याच्या...
बीड जिल्ह्यातील तूर, हरभऱ्याची केवळ...बीड : ‘‘जिल्ह्यात हमी दराने तूर व हरभरा खरेदीसाठी...
सांगली जिल्ह्यात डाळिंबांच्या विम्याचे...सांगली : जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ,...