दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
ताज्या घडामोडी
सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करू ः शरद पवार
मुंबई : राज्याच्या राजकीय स्थितीबाबत बोलण्यासारखे काही नाही. आम्ही वाट पाहतोय, की भाजप शिवसेनेने लवकरात लवकर सरकार बनवावे. आम्हाला विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी जनतेने दिली आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी केले.

शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत बोलत ते होते. पवार म्हणाले, की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा मी दौरा केला आहे. ही स्थिती पाहून शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसानभरपाई मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, नवीन पिकांसाठी कर्जपुरवठा करण्याची गरज आहे. कर्जमाफी व कर्जपुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. विमा कंपन्या जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्यास तयार नाहीत. त्यामुळे केंद्रीय अर्थविभागाने विमा कंपन्याची बैठक घेऊन शेतकऱ्यांना विमा वाटप करण्याचा सूचना द्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, की भाजप शिवसेनेची २५ वर्षांची युती आहे. आजची नाही. जनतेने भाजप शिवसेनेला कौल दिला आहे. त्यांनी सरकार बनवावे. संजय राऊत यांनी जो १७५ आमदारांचा आकडा दिला आहे, त्याचा आम्ही शोध घेत आहोत.
संजय राऊत नेहमीच भेटत असतात. थोड्याच दिवसांत राज्यसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. तिथे काही विषय मांडायचे आहेत. त्याबाबत आम्ही दोघे चर्चा करत असतो, असे पवार यांनी संजय राऊत यांच्याशी भेटीबाबत मत व्यक्त केले.
- 1 of 1030
- ››