agriculture news in marathi Weather based fruit crop insurance scheme for pomegranate | Agrowon

डाळिंबासाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना

विनयकुमार आवटे
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

डाळिंब पीकविम्यासाठी अधिसूचित औरंगाबाद, जालना, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद, बुलडाणा, धुळे, जळगाव, लातूर, बीड, नगर, वाशीम, परभणी, अकोला आणि हिंगोली जिल्ह्यांमधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित मंडळांत लागू आहे.

डाळिंब पीकविम्यासाठी अधिसूचित औरंगाबाद, जालना, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद, बुलडाणा, धुळे, जळगाव, लातूर, बीड, नगर, वाशीम, परभणी, अकोला आणि हिंगोली जिल्ह्यांमधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित मंडळांत लागू आहे.

आंबिया बहर  २०२०-२१   

ही योजना डाळिंब पीकविम्यासाठी अधिसूचित औरंगाबाद, जालना, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद, बुलडाणा, धुळे, जळगाव, लातूर, बीड, नगर, वाशीम, परभणी, अकोला आणि हिंगोली जिल्ह्यांमधील, अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित मंडळांत लागू आहे. या जिल्ह्यांत शासनामार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर हवामान केंद्र आकडेवारीवरून नुकसानभरपाई अंतिम केली जाते. 

या योजनेअंतर्गत डाळिंब पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीकनुकसानीस (आर्थिक) खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल.

शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग 

  • या योजनेत अधिसूचित क्षेत्रांत, अधिसूचित फळपिकांसाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.
  • पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
  • बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी, आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२, ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo Tagging) केलेला फोटो, बँक पासबुक वरील बँक खातेबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता  येतील. 
  • एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक फळपिके असल्यास योजना लागू असलेल्या पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो (मात्र त्या फळपिकासाठी ते महसूल मंडळ अधिसूचित असणे आवश्यक आहे)
  • एक शेतकरी ४ हेक्टर च्या मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता, विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत  राहणार आहे. याहून अधिकचा हप्ता केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान म्हणून देण्यात 
  • येतो. 
  • या विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसानभरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून अदा केली जाते.

 

विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके), विमा संरक्षण कालावधी आणि प्रमाणके (ट्रिगर) नुकसानभरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टर)
जादा तापमान (दि. १ जानेवारी २०२१  ते १५ मार्च २०२१)
सलग २ दिवस कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त राहिल्यास  रुपये १९५००
सलग ३ दिवस कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस किंवा  त्यापेक्षा जास्त राहिल्यास  रुपये ३२५००
सलग ४  दिवस कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस किंवा  त्यापेक्षा जास्त राहिल्यास  रुपये ६५०००
जास्त पाऊस व आर्द्रता (दि. १ जुलै २०२१ ते ३१ जुलै २०२१)  
सलग ५ ते ६ दिवस प्रतिदिन २५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के आर्द्रता राहिल्यास  रुपये १९५००
सलग ७ ते ८ दिवस प्रतिदिन २५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के आर्द्रता राहिल्यास   रुपये ३२५०० 
सलग ९ व त्यापेक्षा जास्त दिवस प्रतिदिन २५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस व ८५ टक्के आर्द्रता राहिल्यास  रुपये ६५०००
गारपिटीपासून संरक्षण कालावधी (दि. १ जानेवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१)
गारपीट झाल्यास रक्कम रुपये ४३३३३ च्या मर्यादेत वैयक्तिक पंचनामा करून नुकसानभरपाई देय राहील. 

योजना कार्यान्वित करणारी यंत्रणा 

कंपनीचे नाव    समाविष्ट जिल्हे
बजाज अलायंज जनरल इन्शुरन्स कंपनी, पुणे बुलडाणा, जळगाव, पुणे, उस्मानाबाद.
भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई   धुळे, सोलापूर, बीड, औरंगाबाद, अकोला, सांगली, हिंगोली.
एचडीएफसी जनरल इन्शुरन्स कंपनी, मुंबई  नगर, नाशिक, वाशीम, सातारा, परभणी, जालना, लातूर

​शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता 
 

हवामान  धोके विमा संरक्षित रक्कम (रुपये प्रति हेक्टर) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता (रुपये प्रति हेक्टर)
जास्त तापमान, जास्त पाऊस  १३००००  ६५००
गारपीट    ४३३३३  २१६७

योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक - ३१ डिसेंबर २०२०

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, कृषी विभाग संकेत स्थळ www.krishi.maharashtra.gov.in वर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा. 

(लेखक कृषी विभागात उपायुक्त (कृषी गणना) आहेत)


इतर कृषी सल्ला
उत्तम भाजीपाला उत्पादनासाठी पोषक हवामानवाटाणा वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या...
पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाणी...रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
गहू, ज्वारी पिकांवरील खोडमाशीचे...बहुतांश ठिकाणी गहू व ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे...
व्यवस्थापन ऊस पाचटाचे ...पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच...
कीड व्यवस्थापनासाठी करा जैविक पद्धतीचा...एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये जैविक कीड...
आंब्यावरील कीड, रोग नियंत्रण व्यवस्थापनकोकणातील हवामानाची सद्यःस्थिती जाणून घेता काही...
कांद्यावर फुलकिडे,करपा रोगाचा... सध्या शेतात रोपवाटिकांमध्ये रब्बी कांद्याची...
ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण सध्या ज्वारीवर खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येत...
ठिबक सिंचनातून खतांचा कार्यक्षम वापरठिबक सिंचन संचाची आखणी आणि उभारणी, जमिनीचे भौतिक...
कृषी सल्ला (कापूस, तूर, रब्बी ज्वारी,...मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत आकाश स्वच्छ ते ढगाळ...
अमेरिकन लष्करी अळीचे एकात्मिक...मागील दोन वर्षांपासून ज्वारी, मका पिकांवर अमेरिकन...
थंडी वाढण्यास अनुकूल हवामान या आठवड्यात महाराष्ट्रातील हवेचे दाब १०१२...
सुरू उसातील सूक्ष्मअन्नद्रव्य व्यवस्थापनमाती परीक्षण अहवालानुसार जमिनीत या सूक्ष्म...
नियोजन सुरू ऊस लागवडीचे...सुरू हंगामातील ऊस लागवड १५ डिसेंबर ते १५...
ऊस पिकावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापनपश्‍चिम महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यापासून ते...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडईचे उत्पादन कमी येण्यासाठी किडीचा प्रादुर्भाव...
राज्यात वाढणार थंडीचे प्रमाणसध्याची परिस्थिती पहातामहाराष्ट्रावर १०१०...
कांद्यावरील फुलकिडीचे व्यवस्थापनकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
कृषी सल्ला (कापूस, तूर, कांदा, गहू,...कपाशी पिकातील २० ते ३० टक्के बोंडे फुटल्यानंतर...
विविध पिकांच्या उत्तमवाढीसाठी आवश्यक...गहू पिकासाठी थंडी आवश्यक असते. गव्हाच्या...