agriculture news in marathi, weather condition favourable for rain, pune, maharashtra | Page 3 ||| Agrowon

राज्यात पावसाला पोषक हवामान 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

पुणे  : ऑक्टोबर हीटचा चटका वाढला असतानाच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. उद्यापासून (ता. ४) मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शनिवारी (ता. ५) पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा, तर  मराठवाडा, कोकणात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे सर्वाधिक ३३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुणे  : ऑक्टोबर हीटचा चटका वाढला असतानाच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. उद्यापासून (ता. ४) मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शनिवारी (ता. ५) पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा, तर  मराठवाडा, कोकणात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे सर्वाधिक ३३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र गुजरात, राजस्थानमधून मध्य प्रदेशाकडे सकरले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने उघडीप दिली असून, उन्हाचा चटका जाणवत आहे. सकाळपासून उन्हाचा ताप, आणि उकाड्यातही वाढ झाली आहे. बुधवारी (ता.२) राज्यात दुपारनंतर अंशत: ढगाळ हवामान झाले होते. उद्यापासून (ता. ४) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात वादळी पावसाला पोषक स्थिती तयार होण्याचा अंदाज आहे.

बुधवारी (ता. २) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.८ (०.३), जळगाव ३२.८ (-१.९), कोल्हापूर ३१.३ (१.२), महाबळेश्वर २१.८ (-२.०), मालेगाव ३३.२ (०.७), नाशिक २९.७ (-१.४), सांगली ३०.३ (-०.९), सातारा ३०.९ (१.६), सोलापूर ३३.८ (१.४), अलिबाग ३२.५ (१.७), डहाणू ३०.१ (-१.४), सांताक्रूझ ३२.१ (०.६), रत्नागिरी ३१.६ (१.४), औरंगाबाद ३१.० (-०.४), परभणी ३२.२ (-०.५), नांदेड ३२.० (-१.२), अकोला ३३.६ (०.२), अमरावती ३२.४ (-१.२), बुलडाणा ३१.४ (१.०), ब्रह्मपुरी ३३.३ (०.५), चंद्रपूर ३३.८ (०.४), गोंदिया ३०.४ (-२.२), नागपूर ३३.० (-०.३), वर्धा ३२.८ (०.३), यवतमाळ ३२.५ (०.३).


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाची...पुणे  : राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक...
टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली...नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात...
दूध संघांना पेमेंट वाटप सुरुपुणे : राज्यातील दूध संघांनी शेतकऱ्यांना दिलेल्या...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...