agriculture news in Marathi, weather favorable for rain in end of month, Maharashtra | Agrowon

महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

पुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार कोसळणाऱ्या पावसाने आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून उघडीप दिली आहे. मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्यात पाऊस ओसरला आहे. मात्र हवामान विभागाच्या मध्यावधी हवामान मॉडेलनुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाला पोषक हवामान होण्याचे संकेत आहेत. यामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार कोसळणाऱ्या पावसाने आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून उघडीप दिली आहे. मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्यात पाऊस ओसरला आहे. मात्र हवामान विभागाच्या मध्यावधी हवामान मॉडेलनुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पावसाला पोषक हवामान होण्याचे संकेत आहेत. यामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

ऑगस्टच्या सुरवातीच्या आठवड्यात कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाने दाणादाण उडवून दिली. अनेक ठिकाणी सातत्याने अतिवृष्टी झाल्याने कोकणातील ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांना पूर आले. तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या नद्यांनी रौद्र रुप धारण केले. कोल्हापूर, सांगलीसह, सातारा, सोलापूर, नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली. सातपुड्यावर उगम पावणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील नद्यांही पात्र सोडले. उजनी, कोयना, जायकवाडी ही प्रमुख धरणे आसंडून वाहिली. मात्र आठवडाभरापासून राज्यात पाऊस ओसरला आहे. 

याबाबत बोलताना पुणे वेधशाळेतील हवामान विभागप्रमुख डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले की, अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात कोणतीही नकारात्मक स्थिती नाही. त्यामुळे सातत्याने कमी दाबाची क्षेत्रे तयार होत आहेत. ही कमी दाबाची क्षेत्रे महाराष्ट्राकडे न येता उत्तर किंवा वायव्य भारताकडे जात आहेत. मात्र ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रालगतच्या भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाला पोषक हवामान होईल.

पुढील पाच दिवसांत कोकणात हलका ते मध्यम पाऊस होईल, उत्तर कोकणात पावसाचे प्रमाण कमी असेल. तर मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता असून, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मराठवाड्यात आज (ता. २१) आणि उद्या (२२) काही भागात हलका ते मध्यम पाऊस शक्य आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता असल्याचे डॉ. कश्यपी यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...
मज चंद्र हवास्थळ बंगळूर, सात सप्टेंबरची मध्यरात्र, वेळ १...
विविधतेतच एकताहिंदी भाषा दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित...
एकत्रित प्रयत्नांमधून झाले लष्करी अळी...नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाने...
पुरंदर, सासवडच्या सीताफळांची परराज्यात...पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवडचे नाव काढताच...
कापडे, हळनोर, कांबळे यांना यंदाचा ‘डॉ....पुणे ः ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘ॲग्रोवन’चे...
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...