पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान
पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान

पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हवामानात वेगाने बदल होत आहे. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. तुरळक ठिकाणी पूर्वमोसमीच्या सरी बरसत आहे. मराठवाड्यातील उमरगा, गंगाखेड, अहमदपूर, देवणी, पालम, उदगीर, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, विदर्भातील बल्लापूर, जोईती, चंद्रपूर, राजुरा येथे पूर्वमोसमी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार वारा सुटून पूर्व मोसमी पावसाच्या सरी पडणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   वातावरणात होत असलेल्या बदलामुळे कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. मंगळवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४६.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. राज्यात मॉन्सूनची चाहूल लागली असून राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. विदर्भात काही अंशी उष्णतेची लाट कायम आहे. त्यामुळे उन्हाचा चटका असून सकाळपासून उन्हाच्या झळा आहे. या झळ्यामुळे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्यावर जात आहे.   मराठवाडा, कोकण, गोव्याच्या काही भागांत व विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. येत्या रविवारपर्यंत विदर्भात व मराठवाड्याच्या काही भागांत उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर या भागातील हवामानात बदल होऊन काही अंशी कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.    मंगळवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः 

  • मध्य महाराष्ट्र ः सोलापूर ३० 
  • मराठवाडा ः उमरगा ४०, गंगाखेड ३०, अहमदपूर, देवणी, पालन, उदगीर २, औसा, जळकोट, लोहारा, परांडा, पूर्णा १०
  • विदर्भ ः बल्लापूर ३०, जोईती २०, चंद्रपूर कोरपना, राजूरा १० 
  • मंगळवार (ता. ४) सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३६.४ (१.१), जळगाव ४२.६ (१.०), कोल्हापूर ३३.७ (०.२), महाबळेश्‍वर ३०.० (२.८), मालेगाव ४१.६ (२.८), नाशिक ३६.६ (०.१), सांगली ३५.२ (०.७) सातारा ३६.९ (२.८), सोलापूर ४१.२ (२.६), मुंबई (सांताक्रुझ) ३५.० (१.६), मुंबई ३४.६ (०.९), अलिबाग ३६.६ (३.८), रत्नागिरी ३३.४ (१.०), डहाणू ३४.७ (०.७), औरंगाबाद ४१.९ (३.८), बीड ४२.६ (३.८), परभणी ४४.५ (४.०), नांदेड ४३.५ (२.९), अकोला ४५.३ (४.२), अमरावती ४५.६ (४.७), बुलढाणा ४०.४ (३.०), ब्रह्मपुरी ४६.७ (४.९), चंद्रपूर ४५.६ (३.१), गोंदिया ४४.० (१.८), नागपूर ४५.७ (३.७), वाशीम ४३.०, वर्धा ४६.५ (४.९) यवतमाळ ४४.० (३.२).

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com