agriculture news in marathi, weather, forecast, cold, temperature | Agrowon

मराठवाडा, विदर्भात किमान तापमानात किंचित घट
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जानेवारी 2018

पुणे : मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. बुधवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ८.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. बुधवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे ८.८ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पश्चिम बंगाल, हरियाना, चंडीगढ, दिल्ली आणि उत्तर राजस्थान या परिसरांतील अनेक ठिकाणी; तर ओडिसा, बिहार, पूर्व मध्य प्रदेश येथील काही ठिकाणी थंडीची लाट आली आहे. राज्यातील मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत थंडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणाच्या काही भागांत थंडी कमी झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. येत्या मंगळवार (ता. १६) पर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही आकाश मुख्यत निरभ्र राहण्याची शक्यता आहे. 
 
कोकणातील मुंबई, रत्नागिरी येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. तर अलिबाग, भिरा, डहाणू येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंशाने वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील निफाड वगळता नगर, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे येथील किमान तापमान दहा अंशांच्यावर होते. 
मराठवाड्यातील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या परिसरात १०.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. परभणी शहरात किमान तापमान ११.४ अंश सेल्सिअस होते. औंरंगाबाद, नांदेड येथील तापमानही दहा अंशांच्या वर होते. विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंशांपर्यंत घट झाली आहे. गोंदियामध्ये ८.५ अंश सेल्सिअस सर्वांत कमी किमान तापमान नोंदविले गेले. त्यापाठोपाठ नागपूरमध्ये किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअस होते. अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ येथील किमान तापमान दहा अंशांच्या वर होते. 

बुधवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) १७.२, अलिबाग १८.६ (१), रत्नागिरी १८.७, भिरा १५.० (१), डहाणू १७.९(१), नगर ११.४, पुणे ११.९ (१), जळगाव ११.४ (-१), कोल्हापूर १६.७ (२), महाबळेश्वर १३.०, मालेगाव १३.० (२), नाशिक ११.० (१), निफाड ८.८, सांगली १५.३ (२), सातारा १३.५ (१), सोलापूर १५.५, औरंगाबाद १२.९ (१),परभणी (कृषी विद्यापीठ आवार) १०.०, परभणी शहर ११.४ (-१), नांदेड १४.५ (१), अकोला १२.१(-२),  अमरावती १३.४ (-१), बुलडाणा १३.२(-१), चंद्रपूर १०.६ (-३), गोंदिया ८.५ (-४), नागपूर ९.४ (-३), वर्धा ११.४ (-१), यवतमाळ १३.० (-२)

इतर अॅग्रो विशेष
सरकारच्या फसव्या आश्वासनांना बळी पडू...जिंतूर, जि. परभणी: शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले जात...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार देशमुखांकडून...नांदेड जिल्ह्यातील पारडी (ता. अर्धापूर) येथील...
आदिवासीबहुल भागात ‘निसर्गराज’ची घौडदौड धुळे जिल्ह्यातील हारपाडा (ता. साक्री) या...
बचत गटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वरमुंबई  : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ...
वनस्पतीतील विषारी अंशाने दगावली ४२...नगर : पावसाळ्यात शेती बांध, मोकळ्या रानात...
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...
संथ वाहते कृष्णामाई...संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख-दुःखाची,...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...