agriculture news in marathi, weather forecast, hailstrom alert in vidharbha | Agrowon

विदर्भात काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 मार्च 2018

पुणे ः विदर्भात काही ठिकाणी आज (ता. ८) मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहून काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता. ९) पुणे परिसरात आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

पुणे ः विदर्भात काही ठिकाणी आज (ता. ८) मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. पुणे परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहून काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यापासून (ता. ९) पुणे परिसरात आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

लक्षद्वीप परिसर ते तेलंगाणा, कर्नाटक या भागांत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याचा अंदाज असून, येत्या शनिवारपर्यंत (ता. १०) विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात कोरडे हवामान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यातील बहुतांशी भागात बुधवारी (ता. ७) ढगाळ हवामान होते. त्यामुळे वातावरणात चांगलाच उकाडा वाढला होता. कोकणातील भिरा येथे सर्वाधिक ४१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यांतील अनेक भागांत, नगर, पुणे मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, विदर्भातील बुलडाणा, वाशीम, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यांत काहीअंशी ढगाळ हवामान होते. तसेच कोकणातील ठाणे, रायगड या भागांतही हवामान ढगाळ होते.  

विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर कोकण, गोवा व विदर्भाच्या उर्वरित भागांत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

बुधवारी (ता. ७) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदविलेले कमाल व कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः  
मुंबई ३१.४ (२५.४), सांताक्रूझ ३३.७ (२४.०), अलिबाग ३१.४ (२३.२), रत्नागिरी ३२.२ (२२.०), डहाणू ३१.७ (२४.९), भिरा ४१.५(२०.५), पुणे ३५.७ (१८.१), नगर ३७.३ (१९.४), जळगाव ३७.४ (१९.४), कोल्हापूर ३६.० (२१.१), महाबळेश्वर ३१.२ (१८.७), मालेगाव ३६.० (२०.०), नाशिक ३४.८ (१८.२), सांगली ३६.८ (१९.९), सातारा ३५.४ (१८.५), सोलापूर ३८.४ (२०.८), उस्मानाबाद ३५.८, औरंगाबाद ३५.६ (२३.०), परभणी ३७.४ (२२.५), नांदेड ३८.० , अकोला ३८.३ (२३.०), अमरावती ३७.२ (२२.०), बुलडाणा ३५.५ (२०.८), ब्रह्मपुरी ३६.९ (१६.९), चंद्रपूर ३७.४ (२३.०), गोंदिया ३४.५ (१९.२), नागपूर ३५.४ (१७.२), वाशीम (२०.०), वर्धा ३६.० (२०.०), यवतमाळ ३६.० (२२.४)

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...