agriculture news in marathi, weather forecast, Hailstrom alert for wednesday | Agrowon

ढगाळ हवामान; गारपिटीची शक्यताही कायम

टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 मार्च 2018

पुणे : छत्तीसगड ते कर्नाटकचा उत्तर भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे क्षेत्र विदर्भाच्या काही भागात दाखल होणार आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भातील अनेक भागांत ढगाळ हवामान तयार होत आहे. येत्या बुधवारी (ता. ७) आणि गुरुवारी (ता. ८) विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : छत्तीसगड ते कर्नाटकचा उत्तर भाग या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. हे क्षेत्र विदर्भाच्या काही भागात दाखल होणार आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भातील अनेक भागांत ढगाळ हवामान तयार होत आहे. येत्या बुधवारी (ता. ७) आणि गुरुवारी (ता. ८) विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

उत्तर भारतातील हिमालय, पश्चिम बंगाल ते मणिपूर या भागात कमी दाबाचा पट्टा आहे. तर आसामच्या पूर्व भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. उत्तरांखड ते राजस्थानच्या पूर्व भागातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. जम्मू आणि काश्मीर, पाकिस्तानचा उत्तर भाग या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्याचा परिणामही काही प्रमाणात राज्यातील हवामानावर होत आहे. रविवारी (ता.४) कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ हवामान होते. त्यामुळे वातावरणात चांगला उकाडा तयार झाला होता. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. आज आणि उद्या राज्यात काही प्रमाणात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

पुणे परिसरातही आकाश मुख्यत निरभ्र राहील. विदर्भातील नंदुरबार येथे ४३.० अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. तर मध्य महाराष्ट्रातील नगर येथे १५.३ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.

राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली. मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. तर कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

रविवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदविलेले कमाल व कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई ३१.८ (२३.८), सांताक्रुझ ३४.८ (२२.६), अलिबाग ३१.२ (२३.५), रत्नागिरी ३२.२ (२२.५), डहाणू ३०.५ (२१.६), भिरा ४०.५ (२१.५), पुणे ३५.७ (१८.४), नगर (१५.३), जळगाव ३८.५ (१९.०), नंदुरबार ४३.०, कोल्हापूर ३५.६ (२०.५), महाबळेश्वर ३१.५ (१७.४), मालेगाव ३७.४ (१९.८), नाशिक ३५.३ (१३.७), सांगली ३६.६ (१९.७), सातारा ३६.१ (१७.९), सोलापूर ३८.१ (२१.२), उस्मानाबाद ३५.४, औरंगाबाद ३६.० (२१.८), परभणी ३८.४ (१९.१), नांदेड ३८.०, अकोला ३८.६(२०.६), अमरावती ३८.६ (२२.६), बुलढाणा ३५.२ (२३.४), ब्रम्हपुरी ३८.९ (१७.२), चंद्रपूर ३८.२ (१९.४), गोंदिया ३७.२ (१८.३), नागपूर ३७.५ (१९.७), वाशीम ३७.६, वर्धा ३८.५ (२१.०), यवतमाळ ३७.५(२२.६) . 


इतर अॅग्रो विशेष
देशात यंदा सर्वसाधारण मॉन्सून; १०२...नवी दिल्ली : देशात यंदा सर्वसामान्य मॉन्सून आणि...
Breaking : मॉन्सून एक्सप्रेस केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....
राज्य सरकारचे ‘पुनश्‍च हरीओम्’ :...मुंबई : कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
अंतिम वर्षाची परीक्षा नाही :...मुंबई : सध्याच्या परिस्थितीत विद्यापीठाच्या...
पीकविम्याचे कामकाज या महिन्यातपुणे: राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा...
टोळधाडबाधितांना मदत देणार : पंतप्रधान...नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत टोळधाडीचे संकट...
मॉन्सून आज केरळात येण्याचे संकेतपुणे  : अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांलगत...
कोकणात मुसळधार पावसाचा इशारापुणे  : अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे...
आठवडाभरापासून टोळधाड विदर्भातचनागपूर   ः गेल्या आठवडाभरापासून...
परभणीतील खरेदी केंद्रावर कापूस विक्रीत...परभणी  ः राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
चाकणच्या जनावरे बाजारात एक कोटींची...पुणे  ः गेल्या सव्वा दोन महिन्यांपासून ‘...
भाजीपाला लागवडीतून उघडला प्रगतीचा मार्गसोयाबीन, भात अशा पारंपरिक कोरडवाहू पिकांवर भिस्त...
सक्रिय रुग्णांची संख्या घटली; एका...नवी दिल्ली : कोरोना महामारीविरूद्धच्या...
विदर्भात टोळधाडीची अस्तित्व कायमनागपूर : कृषी विभागाकडून टोळधाड नियंत्रणासाठी...
राज्यातील भाजीपाला लागवड खोळंबली कोल्हापूर: सध्याच्या स्थितीत भाजीपाल्याचे...
राज्यात देशी कोंबडी पिलांना मागणी वाढली नगर ः काही महिन्यांपूर्वी कोरोना आणि चिकनबाबत...
शेतकऱ्यांची खत विक्री दरात फसवणूक करू...बुलडाणा ः या खरीप हंगामात शेतकऱ्यांना रास्त...
राज्यात बेदाण्याचे सव्वा दोन लाख टन...सांगली : यंदा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर ‘कोरोना...