agriculture news in marathi, weather forecast, short rise in minimum temperature | Agrowon

कमी दाबाचे क्षेत्र निर्मितीस प्रारंभ; किनारपट्टीलगत हलके ढग
टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे : अरबी समुद्र, केरळ ते महाराष्ट्राचा परिसर या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हवामान किंचित ढगाळ होते. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. त्यामुळे किमान तापमानात किंचित वाढ झाली होती. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १५ अंश सेल्सिअची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

पुणे : अरबी समुद्र, केरळ ते महाराष्ट्राचा परिसर या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हवामान किंचित ढगाळ होते. मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे होते. त्यामुळे किमान तापमानात किंचित वाढ झाली होती. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १५ अंश सेल्सिअची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी कोकणातील अनेक भागांत उष्णतेची लाट होती. त्यामुळे किमान, कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढला होता. कमाल तापमानाचा पारा ४२ अंशांपर्यंत पोचला होता. शनिवारी हा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने वाढले आहे. किमान तापमान २२ अंशांपर्यंत गेले आहे.

मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. निफाडपाठोपाठ नगरमध्ये सर्वात किमान तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी नगरमध्ये १५.२ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते. पुणे येथे १५.४ अंश सेल्सिअस तापमान होते. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक १९.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. औरंगाबाद येथे सर्वाधिक १८.४ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. परभणी येथे सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसची घट होऊ किमान तापमान १६.५ अंश सेल्सिअस एवढे होते.

विदर्भात कोरड्या हवामानामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. अकोला येथे सर्वाधिक २१.४ अंश सेलिअस किमान तापमान तापमानाची नोंद झाली. तर चंद्रपूर येथे १६.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसात विदर्भात किमान, कमाल तापमानात आणखी वाढ होणार आहे.

शनिवारी (ता.२) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रूझ) २१.४ (२), अलिबाग २२.० (२), रत्नागिरी २०.७, डहाणू २१.५ (२), भिरा १८.५ (१), पुणे १५.४ (२), नगर १५.२ (-१), जळगाव १८.० (१), कोल्हापूर १९.१ (१), महाबळेश्वर १८.४ (२), मालेगाव १८.६ (४), नाशिक १७.३ (३), निफाड १५.०, सांगली १७.९ (१), सातारा १५.९ (-१), सोलापूर २१.१ (१), औरंगाबाद १८.४ (२), परभणी शहर १६.५ (-२), अकोला २१.४ (३), अमरावती २१.२ (२), बुलढाणा २१.२ (२), चंद्रपूर १६.४ (-३), गोंदिया १७.५, नागपूर १७.६, वर्धा १९.६ (२), यवतमाळ २०.० (१). 

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...