agriculture news in marathi, weather, maximum temperature rise will remain the same | Agrowon

राज्यात उन्हाचा ताप कायम राहणार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 मार्च 2018

पुणे  : राज्यात वाढलेले उन्हाचा ताप सोमवारपर्यंत (ता. २) कायम राहणार आहे. मराठवाड्यात शनिवारी (ता. ३१) ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर राज्याच्या उर्वरीत भागात हवामान उष्ण व कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात अकोला येथे उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पुणे  : राज्यात वाढलेले उन्हाचा ताप सोमवारपर्यंत (ता. २) कायम राहणार आहे. मराठवाड्यात शनिवारी (ता. ३१) ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे, तर राज्याच्या उर्वरीत भागात हवामान उष्ण व कोरडे राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात अकोला येथे उच्चांकी ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंशांच्या वर गेला आहे, तर उत्तर महाराष्ट्रातही उन्हाचा ताप वाढला आहे. तर राज्याच्या सर्वच भागात दिवस रात्रीच्या तापमानात तफावत टिकून आहे. सोमवारपर्यंत राज्यातील उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रापासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने शनिवारी (ता. ३१) मराठवाड्यात ढगाळ हवामान होऊन तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 

शुक्रवार (ता. ३०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल, किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.६, नगर ४१.०, जळगाव ४१.८, कोल्हापूर ३५.५, महाबळेश्वर ३२.६, मालेगाव ४१.०, नाशिक ३०.६, सांगली ३७.०, सातारा ३८.७, सोलापूर ४१.६, मुंबई ३२.०, अलिबाग ३१.६, रत्नागिरी ३१.६, डहाणू ३३.२, आैरंगाबाद ३९.४, परभणी ४१.९, नांदेड ४२.०, अकोला ४२.५, अमरावती ४१.०, बुलडाणा ३९.०, चंद्रपूर ४२.४, गोंदिया ४०.२, नागपूर ४०.९, वर्धा ४१.९, यवतमाळ ४१.५.


इतर अॅग्रो विशेष
सोयाबीन दर विक्रमी पातळी गाठण्याचे संकेतनवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या सोयाबीन...
`उज्ज्वला` योजनेत मोठा भ्रष्टाचारनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी...
गारठा पुन्हा वाढणारपुणे  ः राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून...
पूरबाधित ऊस तोडीस कारखान्यांकडून टाळाटाळपुणे  ः राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन...
नाशिक जिल्ह्यात द्राक्षमणी पोखरणाऱ्या...नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष पीक फुलोरा व मणी...
मराठवाड्यातील ५५ प्रकल्प कोरडेचऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमधील पावसाने दुष्काळाने...
पंजाबचे पशुपालक वापरतात सुधारित तंत्रलुधियाना (पंजाब) येथे प्रोग्रेसिव्ह डेअरी...
शेती, दुग्धव्यवसायाने बनविले...कोल्हापूर जिल्ह्यातील शेळेवाडी (ता. राधानगरी)...
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
देशी गोसंगोपन, गांडूळखतासह दूध...सातारा जिल्ह्यातील कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड)...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
अवकाळी पावसामुळे बाधितांसाठी साडेचार...मुंबई : ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांतील अवकाळी...
डाळिंब बियाच्या तेलापासून ‘सॉफ्टजेल...सोलापूर ः येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात...पुणे  ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व...
आव्हाने खूप सारी, तरीही मधमाशीपालनात...नाशिक येथे पूर्वा केमटेक या कंपनीतर्फे नुकताच...
आकस्मिकता निधीच्या मर्यादेत तात्पुरत्या...मुंबई : महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या...
खासगी प्रवासी बसमधून शेतमाल वाहतुकीला...सोलापूर : राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई,...
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
विदर्भात वादळी पावसाची शक्यता पुणे ः विदर्भाच्या काही भागांत हवामान ढगाळ आहे....
मूळ समस्यांशी थेट भिडावे लागेल ऑगस्टपर्यंत पावसाची वाट पाहणारा शेतकरीवर्ग...