agriculture news in marathi, weather prediction, pune, maharashtra | Agrowon

कोकणात पाऊस जोर धरणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

पुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू लागताच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आजपासून (ता. १६) कोकणात पाऊस जोर धरणार आहे, तर उद्यापासून (ता. १७) रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत, तर मंगळवारपासून दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू लागताच राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आजपासून (ता. १६) कोकणात पाऊस जोर धरणार आहे, तर उद्यापासून (ता. १७) रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत, तर मंगळवारपासून दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

शनिवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, सातारा या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवारी दिवसभर कोकण, मध्य महाराष्ट्रात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. कोकणात पावसाच्या सरी बरसत होत्या. आज (ता. १६) सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी, तर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातही हलक्या सरींचा अंदाज आहे.

राज्यात असलेले ढगाळ हवामान, वाऱ्यांचा वेग वाढल्याने उन्हाचा ताप कमी झाला आहे. जून महिन्याच्या सुरवातीला ४८ अंशांपर्यंत गेलेले विदर्भातील तापमान पुन्हा ४५ अंशांपर्यंत खाली आले आहे. शनिवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात कमाल तापमान ३९ ते ४५ अंश, मध्य महाराष्ट्रात २१ ते ४१, मराठवाड्यात ३६ ते ४२ आणि कोकणात ३२ ते ३४ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. उद्यापासून (ता. १७) विदर्भातील उष्ण लाट ओसरण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : कृषी विभाग)    

कोकण : ठाणे ४०, बेलापूर ४२, अलिबाग ४५, किहीम ६३, सरल ५०, चरी ४५, रोहा ४२, मुरूड ४४, श्रीवर्धन ४८, म्हसला ८०, खामगाव ६२, मंडणगड ५४, म्हाप्रल ४४, देव्हरे ८२, देवळे ४९, मालवण ५०, सावंतवाडी ४०, आंबोली ४५, पालघर ४७, बोईसर ४२, तारापूर ४१.

मध्य महाराष्ट्र : धारदगाव १२, मुठे २५, काले ११, कार्ला १२, वेल्हा १४, कण्हेर १०, जावळी १०, बामणोली १६, केळघर १६, म्हावशी १०, ढेबेवाडी १२, तळमावळे १०, कुठरे १८, कोळे १०, किन्हई १०, पुसेसावळी १०, महाबळेश्‍वर ३९, तापोळा १८, लामज २२, चरण १९. 

इतर अॅग्रो विशेष
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...