कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन लांबल्याने पावसाने अद्यापही जोर धरलेला नाही. मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. आज (ता. १९) कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची, तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर, विदर्भात उष्ण लाटेचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.   

‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक स्थिती होत आहे. मंगळवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील चंद्रपूर, वर्धा येथे उष्ण लाट होती. चंद्रपूर येथे ४२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ‘वायू’ चक्रीवादळ ओसरल्यानंतर अरबी समुद्रात ढग जमा होण्यास सुरवात झाली आहे.

राज्यातही दुपारनंतर अंशत: ढगाळ हवामान होते. शनिवारपासून (ता. २२) मृग नक्षत्र संपून सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होत असून, राज्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

मंगळवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये, स्रोत : (कृषी विभाग) ः कोकण : मुंब्रा १७, खर्डी ३६, वसींड १६, उल्हासनगर १५, म्हसला २०, दापोली ४२, बुरवंडी ४५, वेलवी ४८, खेड २१, देव्हरे १६, लांजा १८.  मध्य महाराष्ट्र : धारगाव २४, राशीन १५, शेंडी १४, घोटावडे १०, माले १८, मुठे १८, वेल्हा ६२, विंझर २८, महाबळेश्‍वर १६, तापोळा ११, लामज १८. मराठवाडा : औरंगाबाद २७, गेवराई ११, तळवडा १०. विदर्भ : धुळघाट १६, राजोली १५, गंगाझारी ११, रत्नारा १६, गोंदिया १९, परसवाडा १४, देवरी १३, गडचिरोली ११, पोरळा १०, येवळी १५, पुराडा १२, कुंघाडा १२, सिरोंचा ११, असारळी १०, जरावंडी १६, चाटेगाव १६, बेडगाव १२.   मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १४) कर्नाटकच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे. त्यानंतर पूर्व भारतात प्रगती करणाऱ्या मॉन्सूनची अरबी समुद्रावरील वाटचाल ‘जैसे थे’ आहे. ‘वायू’ चक्रीवादळामुळे प्रभावित झालेले मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले असून, शुक्रवारपर्यंत (ता. २१) मॉन्सून दक्षिण कोकणात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com