agriculture news in marathi, weather prediction, pune, maharashtra | Agrowon

कोकणात पाऊस जोर धरणार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 20 जून 2019

पुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती निर्माण झाल्याने कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पावसाने जोर धरला आहे. कोकण किनाऱ्यालगतच्या समुद्रात ढगांची दाटी होऊ लागली आहे. आज (ता. २०) कोकणात पावसाचा जोर वाढून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

पुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती निर्माण झाल्याने कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पावसाने जोर धरला आहे. कोकण किनाऱ्यालगतच्या समुद्रात ढगांची दाटी होऊ लागली आहे. आज (ता. २०) कोकणात पावसाचा जोर वाढून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांत बुधवारी (ता. १९) दुपारपासूनच मुसळधार पावसाला सुरवात झाली. सिंधुदुर्गमध्ये जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात पावसाचा जोर अधिक असून, कोरडे पडलेले नदीनाले या पावसामुळे वाहू लागले आहेत; तर कोकणासह मध्य महाराष्ट्रात ढगांची फळी दिसून येत आहे. विदर्भ, मराठवाड्यातही अंशत: ढगाळ हवामान होत आहे. यातच राज्याच्या तापमानातही घट होत असून, विदर्भात तापमान ४२ अंशांच्या खाली; तर उर्वरित राज्यात जवळपास सर्व ठिकाणी तापमान ४० अंशांच्या खाली घसरले आहे. 

बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये स्रोत : कृषी विभाग)  ः कोकण : ठाणे ४०, भाईंदर ३६, अलिबाग ४३, किहीम ६०, सरल ६२, चरी ४७, पनवेल ४०, पवयंजे ४२, नेरळ ४१, कळंब ४०, पेण ३४, हमरापूर ६२, वशी ५८, लोनेरे ४०, चानेरा ३६, कोलाड ३०, मुरूड ३४, मेंढा ३३, मार्गतम्हाणे ४३, रामपूर ३५, वाकवली ३०, वेलवी ३३, तलवली ३२, पटपन्हाले ८०, अबलोली ३०, म्हाप्रल ३०, कोटवडे ३६, तुलसानी ३५, राजापूर ६०, कुंभवडे ४९, लांजा ४०, भांबेड ४७, पूनस ४४, सातवली ८५, विलवडे ५५. आंबोली ४०, कसाल ४५, तालवट ३४. 
मध्य महाराष्ट्र : इगतपुरी १४, मोरांबा १३, शेंडी १०, घोटावडे १७, माले १९, मुठे १२, लोणावळा १७, बामणोली २४, हेळवाक ३९, महाबळेश्‍वर २३, लामज १६, आंबा १४, राधानगरी १२, गगनबावडा १६, साळवण ३७, गवसे १२, हेरे १९.

इतर अॅग्रो विशेष
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...
दुष्काळामुळे द्यावा लागणार पाणी...पुणे ः सततच्या दुष्काळामुळे आता पाणी...
पीक पोषणात महत्त्वाची अन्नद्रव्ये पिकांच्या सुदृढ वाढीसाठी १८ अन्नद्रव्यांची...
मिल्क केक बनविण्याची प्रक्रियामिल्क केक हा दिसायला कलाकंदप्रमाणे असला तरी...
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते जोरदार...पुणे ः राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार...
सोयाबीनवरील कीडीची ओळख सोयाबीन हे राज्यातील महत्त्वाचे पीक असून, त्यावर...
नांदेड जिल्ह्यात अन्नधान्य पिकांच्या...नांदेड : जिल्ह्यात गुरुवारपर्यंत (ता. १८) ६ लाख...
एकाच गावातील ७५० एकरांत ७५०० कामगंध...जालना : गतवर्षी नियंत्रण मिळविलं म्हणून कपाशीवरील...
जलसंधारणाचा खामगाव पॅटर्न देशभरात जाणारअकोला ः राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना त्यासाठी...
कृत्रीम शीतपेयांना शोधला कोकणी नैसर्गिक...कोकणातील निसर्गरम्य कोळथर (ता. दापोली, जि....
फुलांनी आणला आयुष्यात बहर, अॅग्रोवनची...पुणे जिल्ह्यात रुई येथील सुहास लावंड यांनी...
जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय ...दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव...
दुष्काळातही कडवंची गावच्या अर्थकारणाची...भूगर्भीय सर्वेक्षण आधारित पाणलोटाची कामे, मृद...
मातीची सुपीकता टिकविणे आव्हानात्मक: डॉ...कोल्हापूर : कोल्हापूर विभागात मातीची सुपीकता...
साखर कारखान्यांना कर्ज न देणाऱ्या...मुंबई: आगामी हंगामासाठी साखर कारखान्यांना...
कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्याचा करारअकोला ः  केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य...
जीवनावश्‍यक वस्तू कायद्यावर प्रश्‍नचिन्हनवी दिल्ली: जीवनावश्‍यक वस्तू कायद्याची आवश्यकता...
जनतेचा पैसा जनतेच्याच भल्यासाठीतत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९ जुलै...
कृत्रिम पाऊस : गप्पा अन् गांभीर्यमागील पावसाळ्यातील कमी पावसामुळे राज्यात भीषण...