agriculture news in marathi, weather prediction, pune, maharashtra | Agrowon

 पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

पुणे   : बंगालच्या उपसागरात आज (ता. २९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी (ता. २८) सकाळपासून राज्यात ढगाळ हवामान होते, त्यामुळे उकाड्यातही वाढ झाली.

पुणे   : बंगालच्या उपसागरात आज (ता. २९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी (ता. २८) सकाळपासून राज्यात ढगाळ हवामान होते, त्यामुळे उकाड्यातही वाढ झाली.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. विदर्भातील तापमान कमी झाले असून, उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढेच असून, सोलापूर येथे सर्वाधिक ३४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. यातच उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्यास पोषक हवामान होत आहे. 

बुधवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) : कोकण : दोडामार्ग ३०, कुडाळ, कणकवली, पेण, मंडणगड, जव्हार, मुरूड, गुहागर, माथेरान, चिपळूण, ठाणे प्रत्येकी २०. 
मध्य महाराष्ट्र : जामनेर ४०, इगतपुरी २०, आक्रणी, पारोळा, बोधवड, चाळीसगाव प्रत्येकी २०, मुक्ताईनगर, गगणबावडा, रावेर, गिरणा धरण, धरणगाव, शहादा, एरंडोल, अक्कलकुवा, जळगाव, सिंदखेडा प्रत्येकी १०. 
विदर्भ : वर्धा, देवळी, नांदगावकाझी, बाळापूर, एटापल्ली, पातूर प्रत्येकी १०.
घाटमाथा : आंबोणे ३०, शिरगाव, ताम्हिणी २०.  


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...