agriculture news in marathi, weather prediction, pune, maharashtra | Agrowon

वादळी पावसाचा अंदाज कायम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

पुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे; तर बंगालच्या उपसागरातही नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या दोन्ही प्रणाली पूरक ठरल्याने राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. सोमवारी (ता.२१) राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली होती. ढगाळ हवामानासह ऊनही पडत होते. 

पुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे; तर बंगालच्या उपसागरातही नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. या दोन्ही प्रणाली पूरक ठरल्याने राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. सोमवारी (ता.२१) राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली होती. ढगाळ हवामानासह ऊनही पडत होते. 

अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे यांचा संगम दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होत असल्याने या भागात पावसाने जोर धरला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्यापर्यंत (ता. २३) वादळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असून, उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. संततधार पाऊस, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात मोठी घट झाली. दोन दिवसांपासून ऑक्टोबर हीटचा चटका कमी झाला. मात्र सोमवारी पावसाने उघडीप दिल्याने तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता.२१) मराठवाड्यातील नांदेड येथे सर्वाधिक ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.


इतर अॅग्रो विशेष
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...
मुगावर काय फवारायचे?अकोला ः कडधान्य वर्गीय पिकांपैकी एक प्रमुख...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
दूध दर आंदोलनाचा राज्यभर एल्गारपुणे: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती व...
पीकविमा नोंदणीत महाराष्ट्राची आघाडीपुणे: डिजिटल तंत्राचा वापर करून पंतप्रधान पीकविमा...