agriculture news in marathi, weather prediction, pune, maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधारेचा इशारा 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

पुणे  : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात वादळी पाऊस पडत आहे. आज (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सोमवारी (ता. २१) दिवसभर असलेल्या उघडिपीने कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. 

पुणे  : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात वादळी पाऊस पडत आहे. आज (ता. २३) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मेघगर्जना, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सोमवारी (ता. २१) दिवसभर असलेल्या उघडिपीने कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. 

अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे यांचा संगम दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात होत असल्याने या भागात पावसाने जोर धरला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होत असतानाच, बंगालच्या उपसागरात मंगळवारी (ता. २२) नवीन कमी दाबचे क्षेत्र तयार झाले आहे. या दोन्ही प्रणाली पूरक ठरून दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे. कोकणात आज (ता. २३) अति जोरदार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकण किनाऱ्यालगत ताशी ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

सोमवारी (ता. २१) दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. ढगाळ हवामानासह ऊनही पडत होते. त्यामुळे गेली दोन तीन दिवस कमी झालेले कमाल तापमान पुन्हा वाढल्याचे दिसून आले. कोकणात तापमान ३० अंशांच्या पुढे गेले. मंगळवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अलिबाग येथे सर्वाधिक ३५.४ अंश सेल्सिअस तापामनाची नोंद झाली. रत्नागिरी येथे तापमान ३४.३ अंशांवर पोचले. पावसाळी वातावरणामुळे तापमानात चढउतार होण्याची शक्यता आहे. 

मंगळवारी (ता. २२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.५ (-३.२), जळगाव २७.२(-७.६), कोल्हापूर २७.८(-३.६), महाबळेश्वर २२.८(-३.१), मालेगाव २५.२ (-८.२), नाशिक २७.० (-५.३), सातारा २६.५ (-४.२), सोलापूर २९.४ (-३.३), अलिबाग ३५.४ (३.०), डहाणू ३३.० (०.३), सांताक्रूझ ३३.१ (-०.५), रत्नागिरी ३४.३(१.९), औरंगाबाद २८.० (-३.९), परभणी २७.६ (-४.९), नांदेड ३३.० (०.२), अकोला २९.० (-४.५), अमरावती २७.२ (-६.४), बुलडाणा २३.८ (-६.६), चंद्रपूर २९.२(-३.५), गोंदिया २९.५(-२.८), नागपूर २९.४ (-३.३), वर्धा २८.९ (-३.७), यवतमाळ २७.०(-४.७). 


इतर अॅग्रो विशेष
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
लोकसहभागातून शेती अन् ग्रामविकासाला...उंबरीवाडी (ता.जावली,जि.सातारा) हे लहानसे गाव....
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...
राज्यात सर्वदूर हलका पाऊसपुणे ः राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम...
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी...जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी...
शेतकऱ्यांचे वनौषधी अनुदान पुन्हा रखडलेपुणे: राज्यात वनौषधी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे...
दुर्गम शेतकऱ्यांसाठी जलकुंडे ठरली वरदानठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दुर्गम...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत...यावल, जि. जळगाव: केंद्राने ‘एक देश एक बाजार समिती...
‘एचटीबीटी’मुळे कपाशीतील आंतरपिके...पुणे : काळ्याबाजारातून आलेल्या तणनाशक सहनशील (...