agriculture news in marathi, weather prediction, pune, maharashtra | Agrowon

‘क्यार’ चक्रीवादळ आज तीव्र होणार; राज्यात पाऊस ओसरण्याचा अंदाज

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

पुणे  : कोकण किनाऱ्याजवळील अरबी समुद्रात असलेल्या ‘क्यार’ चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे. या वादळाचे अतितीव्र वादळात रूपांतर होणार आहे. मात्र आजपासून (ता. २६) हे वादळ पश्चिमेकडे अरबी समुद्रातून ओमानच्या दिशेने जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. वादळाबरोबरच बाष्पही ओढले जाऊन राज्यातील पावसाचा जोरही ओसरण्याचा अंदाज आहे. मात्र किनाऱ्यालगत उंच लाटा उसळून समुद्र खवळण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

पुणे  : कोकण किनाऱ्याजवळील अरबी समुद्रात असलेल्या ‘क्यार’ चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे. या वादळाचे अतितीव्र वादळात रूपांतर होणार आहे. मात्र आजपासून (ता. २६) हे वादळ पश्चिमेकडे अरबी समुद्रातून ओमानच्या दिशेने जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. वादळाबरोबरच बाष्पही ओढले जाऊन राज्यातील पावसाचा जोरही ओसरण्याचा अंदाज आहे. मात्र किनाऱ्यालगत उंच लाटा उसळून समुद्र खवळण्याचा इशारा देण्यात आला आहे.  

शुक्रवारी (ता. २५) पहाटे ‘क्यार’ चक्रीवादळाने सिंधुदुर्ग किनारपट्टीलगतच्या मालवण, वेंगुर्ला भागाला जोरदार तडाखा दिला. चक्रीवादळामुळे समुद्र खवळला असून अजस्र लाटा किनारपट्टीला धडकत आहेत. खवळलेल्या समुद्राचे पाणी वस्त्यांमध्ये घुसले. वादळामुळे जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत. किनारपट्टीलगत ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने जोदार वारे वाहत आहेत. शुक्रवारी या चक्रीवादळाचे केंद्र रत्नागिरीपासून २१० किलोमीटर, तर मुंबईपासून ३७० किलोमीटर नै्ऋत्य दिशेला होते. 

आज (ता. २६) हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार आहे, तर ही प्रणाली हळूहळू ओमानच्या सलालाह किनाऱ्याकडे सरकत जाताना अतितीव्र होईल. किनाऱ्यालगत असलेल्या कोकण किनारपट्टी, गोवा आणि कर्नाटक राज्यात ढगांची दाटी झाली असून, या भागात जोरदार पाऊस पडत आहे. आजपासून (ता. २६) पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. कोकणासह राज्यात हलक्या पावसाचा अंदाज असून, नगर, पुणे, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ढगाळ हवामान आणि पावसाच्या हजेरीने तापमानात चढ-उतार होत असून, शुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नांदेड येथे सर्वाधिक ३३.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २७.४ (-३.८), जळगाव २४.४ (-९.९), कोल्हापूर २४.४ (-९.९),  मालेगाव २३.२ (-९.५), नाशिक २४.३ (-७.५), सांगली २५.० (-७.३), सातारा २४.५ (-५.४), सोलापूर २९.३ (-३.३), अलिबाग २८.४ (-४.४), रत्नागिरी २६.१ (-६.९), औरंगाबाद २४.४ (-६.९), परभणी २७.५ (-४.४), नांदेड ३३.० (०.३), अकोला २६.० (-६.९), अमरावती २७.८ (-५.०), बुलडाणा २१.४ (-८.६), ब्रह्मपुरी २९.८ (-२.०), चंद्रपूर ३०.० (-२.४),नागपूर २८.९ (-३.१), वर्धा २९.५ (-२.३).


इतर अॅग्रो विशेष
उपयुक्त मधुमक्षिकापालन दुर्लक्षितच! मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार,...
दर्जानुसारच हवा दरराज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक...
मध ठरू पाहतेय साखरेला पर्याय...खरंच ‘...नागपूर : साखरेमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या...
भविष्यातील आहारामध्ये असतील फुलेहीसामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या...
खासगी डेअरी उद्योगाला अनुदानाच्या...पुणे  : देशातील दुग्ध व्यवसायाला चालना...
तब्बल 'एवढे' पीकविमा अर्ज दाबून ठेवलेपुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत कंपन्या...
शेतकरी म्हणतात...तोपर्यंत बँकांच्या...मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा उतारा...
बदलत्या वातावरणामुळे आंबेमोहराला विलंबरत्नागिरी ः सोबा चक्रीवादळामुळे कोकणातील वातावरण...
कष्ट, अनुभवातून साकारली भाजीपाला पिकाची...मूळचे सावत्रा (ता. मेहकर, जि. बुलडाणा) गावचे...
देशी बियाण्यांची तयार केली सीड बॅंकभाजीपाला, फुलझाडे आणि विविध औषधी, सुगंधी...
बियाणे कायद्यात होणार सुधारणापुणे : देशाचा जुनाट बियाणे कायदा बदलण्याच्या...
ढगाळ हवामानाचा अंदाजपुणे ः अरबी समुद्रात असलेल्या पवन चक्रीवादळाचा...
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृत्रिम रेतन हवे नियंत्रितचकृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या...
दुष्काळ हटविण्याचा ‘जंगल मार्ग’ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कायम दुष्काळ असतो....
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची...पुणे  ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या...
घोडेगावला कांद्यास कमाल १६५०० रुपये दरनगर  : जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा...
जमिनीच्या आरोग्याबाबत ३५१ गावे होणार...पुणे  ः शेतकऱ्यांना जमीन आरोग्य तपासणीचे...
शिरोळमधील पूरबाधित जमिनींमध्ये वाढले...कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी दक्षिण...
रुईच्या टक्‍केवारीवर ठरणार कापसाचा दर...वर्धा ः कापसातील रुईची टक्‍केवारी विचारात घेत...