agriculture news in marathi, weather prediction, pune, maharashtra | Agrowon

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात वादळी पावसाचा इशारा 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

पुणे  : अरबी समुद्रातील ‘क्यार’ वादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. दिवसभर उन्हाचा चटका वाढल्याने स्थानिक वातावरणात बदल होत, ढगांची निर्मिती होत आहे. सायंकाळी किंवा रात्री उशिरा या भागात वादळी वारे, मेघगर्जना, विजा आणि गारांसह पाऊस पडत आहे. आज (ता. ३०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

पुणे  : अरबी समुद्रातील ‘क्यार’ वादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली आहे. दिवसभर उन्हाचा चटका वाढल्याने स्थानिक वातावरणात बदल होत, ढगांची निर्मिती होत आहे. सायंकाळी किंवा रात्री उशिरा या भागात वादळी वारे, मेघगर्जना, विजा आणि गारांसह पाऊस पडत आहे. आज (ता. ३०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

अरबी समुद्रात असलेले ‘क्यार’ महावादळ ओमानच्या किनाऱ्याकडे सरकले आहे. या प्रणालीची तीव्रता कमी होऊ लागली असून, मुंबईपासून पश्‍चिमेकडे ९९० किलोमीटर अंतरावर अतितीव्र चक्रीवादळ घोंघावत होते. काहीसे दक्षिणेकडे वळून आदेनच्या खाडीकडे जाताना वादळाची तीव्रता आणखी कमी होणार आहे. यातच केरळच्या किनाऱ्यालगत असलेल्या कोमोरीन परिसरावर ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. बुधवारपर्यंत (ता. ३१) या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत लक्षद्वीप बेटांजवळ कमी तीव्रतेचे वादळ (डीप डीप्रेशन) तयार होण्याचे संकेत आहेत. 

मंगळवारी (ता. २९) दिवसभर उन्हाच्या चटका वाढला होता. तर ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही चांगलीच वाढ झाली होती. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दुपारनंतर ढगांची दाटी होण्यास सुरवात झाली होती. आज (ता. ३०) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बीड, उस्मानाबाद, बुलडाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

तापमान पुन्हा तिशीपार 
राज्याच्या बहुतांशी भागात दिवसभर मुख्यतः कोरडे हवामान राहत आहे. यामुळे राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने राज्यात तापमान पुन्हा तिशीपार गेले आहे. मंगळवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्‍वर, सातारा, औरंगाबाद, यवतमाळचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच ठिकाणी तापमान ३० अंशांच्या पुढे गेले आहे. पुढील काही दिवस दिवसभर ऊन- सावल्यांचा खेळ सुरू राहणार असून, तापमानातील वाढही कायम राहण्याची शक्यता आहे. 

सोमवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३१.९ (०.८), जळगाव ३१.१(-२.६), कोल्हापूर ३०.२ (-०.७), महाबळेश्‍वर २४.६ (-०.९), मालेगाव ३०.६ (-२.१), नाशिक ३१ (-०.७), सांगली ३०.६ (-१.७), सातारा २९.६ (-०.४), सोलापूर ३२.१ (०.१), अलिबाग ३३.८ (०.६), डहाणू ३२.३ (-१.०), सांताक्रूझ ३३.५ (-०.७), रत्नागिरी ३३.९ (०.६), औरंगाबाद २८.६ (-२.३), परभणी ३१.३ (-०.१), अकोला ३०.२ (-२.४), अमरावती ३० (-२.४), बुलडाणा ३१.९ (२.२), ब्रह्मपुरी ३४.७ (३.४), चंद्रपूर ३२.२ (०.४), गोंदिया ३०.२(-१.३), नागपूर ३१.१ (-०.५), वर्धा ३०.४ (-१.१), यवतमाळ २९ (-१.६). 


इतर अॅग्रो विशेष
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...
नदी संवर्धनाचा केरळचा आदर्शकेरळ हे भारताच्या दक्षिण टोकाचे एक राज्य. अरबी...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणेछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा...
आपणच आपला करावा उद्धारशेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र...