agriculture news in marathi, weather prediction, pune, maharashtra | Agrowon

जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

पुणे  : पहाटे पडत असलेले धुके, सकाळपासून वाढणारा चटका, दुपारनंतर ढगाळ हवामानसह उकाड्यात झालेली वाढ, सायंकाळनंतर पडत असलेला पाऊस असेच काहीसे हवामान राज्याच्या विविध भागांत अनुभवायला येत आहे. बहुतांशी भागांत पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमान पुन्हा तिशीपार गेले आहे. आज (ता. ७) अरबी समुद्रातील ‘महा’वादळामुळे राज्यातील काही भागांत जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

पुणे  : पहाटे पडत असलेले धुके, सकाळपासून वाढणारा चटका, दुपारनंतर ढगाळ हवामानसह उकाड्यात झालेली वाढ, सायंकाळनंतर पडत असलेला पाऊस असेच काहीसे हवामान राज्याच्या विविध भागांत अनुभवायला येत आहे. बहुतांशी भागांत पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमान पुन्हा तिशीपार गेले आहे. आज (ता. ७) अरबी समुद्रातील ‘महा’वादळामुळे राज्यातील काही भागांत जोरदार वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  

‘महा’चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने येत असून, त्याचा काही परिणाम दोन दिवस उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत जाणवणार आहे. आज (ता. ७) पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित कोकण, किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाड्यातही वाऱ्याचा वेग वाढून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  

मंगळवारी (ता. ५) सायंकाळी सांगली जिल्ह्याच्या कवठे पिरान (ता. मिरज) या गावात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. राज्याच्या बहुतांशी भागात पावसाने काहीशी उघडीप दिल्याने तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. महाबळेश्वर, बुलडाण्यासह एखाददुसरा अपवाद वगळता राज्यात तापमानाचा पारा तिशीपार गेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी कमाल ३० ते ३४ अंश, तर किमान तापमान १९ ते २५ अंशांच्या आसपास होते. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

बुधवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३०.८ (०.०), नगर ३१.४ (०.३), जळगाव ३३.४ (-०.१), कोल्हापूर ३१.१ (०.३), महाबळेश्वर २४.६ (-१.०), मालेगाव ३१.४ (-०.९), नाशिक ३२.३ (०.९), सातारा ३०.५ (१.०), सोलापूर ३२.६ (०.९), अलिबाग ३१.७ (-१.७), डहाणू ३२.५ (-०.५), सांताक्रूझ ३४.२ (०.०), रत्नागिरी ३२.९ (-०.९), औरंगाबाद ३१.६ (१.०), परभणी ३२.६ (१.५), नांदेड ३३.० (१.२), अकोला ३३.० (०.७), अमरावती ३३.० (०.९), बुलडाणा २९.४ (०.३), ब्रह्मपुरी ३४.१ (३.०), चंद्रपूर ३२.२ (०.८), गोंदिया ३२.० (०.९), नागपूर ३३.२ (२.०), वर्धा ३२.९ (१.४), यवतमाळ ३१.५ (१.१).


इतर ताज्या घडामोडी
योग्य पद्धतीने करा बटाटा काढणीयंदा बटाटा पिकाची काढणी फेब्रुवारी- मार्च...
मध्य प्रदेशात द्राक्ष लागवडीसाठी ‘...पुणे : मध्य प्रदेशातील बागायतदार शेतकरी आता...
खरबूज लागवड तंत्रज्ञानखरबूज पिकाची लागवड जानेवारी ते मार्च यादरम्यान...
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण,...नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती...
जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कांदा दरांवरील दबाव वाढलाजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
गडहिंग्लजमध्ये यंदा अधिक पाणीसाठागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : गतवर्षीच्या ऑगस्ट...
यवतमाळ जिल्हा बॅंकेकरिता तब्बल ३००...यवतमाळ  ः जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या...
मोसंबीला खतमात्रा देणे अत्यंत आवश्‍यक...औरंगाबाद : ‘‘मोसंबी पीक हे शेतकऱ्यांची...
उच्च तंत्रज्ञानावर आधारित फुलशेती...नाशिक : मालेगाव तालुक्यातील वडेल येथील कृषी...
नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीत १.२६...नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भूजल पातळीमध्ये...
नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार...नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या...
‘भीमा’च्या कामगारांचे पैसे पाच...मोहोळ, जि. सोलापूर : कामगारांच्या खात्यावर ५...
सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून भाजप...मुंबई ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव...
करमाळ्यात शुद्ध; पंढरपुरात सर्वांत...सोलापूर : जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे ६१५...
शिवस्मारक निविदेत गैरव्यवहार नाही;...मुंबई ः मुंबईजवळच्या अरबी समुद्रात उभारण्यात...
तूर खरेदीसाठी हमी देण्याबाबत मंत्रिमंडळ...मुंबई ः ‘‘राज्यात सध्या ३१७ तूर खरेदी केंद्रे...
पुणे जिल्ह्यात भाजीपाला पिकांकडे...पुणे ः गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पोषक...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी २६ मार्चला...मुंबई ः राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च...