agriculture news in marathi, weather prediction, pune, maharashtra | Page 2 ||| Agrowon

गारठा वाढला; नगर येथे नीचांकी तापमान

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

पुणे  : उत्तरेकडून येणारे थंड वारे, पहाटेच्या वेळी पडणारे धुके यामुळे राज्यात गारठा वाढू लागला आहे. सोमवारी (ता. ११) नगर येथे १४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्हे वगळता सर्वत्र किमान तापमानात घट होत आहे. निरभ्र आकाशामुळे दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. आज (ता. १२) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. 

पुणे  : उत्तरेकडून येणारे थंड वारे, पहाटेच्या वेळी पडणारे धुके यामुळे राज्यात गारठा वाढू लागला आहे. सोमवारी (ता. ११) नगर येथे १४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्हे वगळता सर्वत्र किमान तापमानात घट होत आहे. निरभ्र आकाशामुळे दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. आज (ता. १२) राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. 

बंगालच्या उपसागरातील ‘बुलबुल’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर त्रिपुरा आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत आहे. सोमवारी (ता. ११) हरियानातील हिस्सार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे येऊ लागल्याने वायव्य, पूर्व आणि मध्य भारतातील राज्यामध्ये तापमानात २ ते ३ अंशांनी घट होऊ लागली आहे.

महाराष्ट्रातही किमान तापमान सरासरीपेक्षा खाली येण्यास सुरुवात झाली आहे. पुणे, महाबळेश्वर, सातारा, नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, परभणी, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे तापमान १९ अंश किंवा त्यापेक्षा खाली आले आहे. 

सोमवारी (ता. ११) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १६.८ (१), नगर १४.० (-१), जळगाव १८.६ (३), कोल्हापूर २०.१ (१), महाबळेश्वर १५.९ (१), मालेगाव १८.६ (४), नाशिक १७.५ (३), सांगली १९.७ (१), सातारा १७.० (०), सोलापूर २०.५ (१), अलिबाग २३.५ (२),  रत्नागिरी २२.५ (०), औरंगाबाद १५.६ (०), परभणी १७.४ (०), नांदेड १९.५ (३), अकोला १८.२ (०), अमरावती १९.० (०), बुलडाणा १७.० (-१), चंद्रपूर २१.० (३), गोंदिया १६.८ (-१), नागपूर १५.८ (-१), वर्धा १८.६ (१), यवतमाळ १७.४ (०).


इतर अॅग्रो विशेष
प्रक्रिया उद्योगातून सोयाबीनचे...शहरी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड...
शेवतींच्या फुलांनी जिंकले मन !...मांजरी, पुणे : विविधरंगी शेवंतीच्या फुलांनी...
कमी पाण्यामध्ये सीताफळाचे किफायतशीर...सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल...
दर्जेदार वांगी उत्पादनात मानेंचा हातखंडाकसबे डिग्रज (ता. मिरज, जि. सांगली) येथील युवा...
देशी कपाशीतील संशोधनाची शंभरीपरभणी येथील कापूस संशोधन केंद्र, मेहबूब बागची...
जैवविविधता संवर्धनासाठी सामूहिक...नाशिक: पर्यावरणाची योग्य ती काळजी न घेतल्याने...
देशी कापसाचा ब्रॅंड आवश्‍यकपरभणी ः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लांब धाग्याच्या...
...'या' बॅंकांचे थकले चौदा हजार कोटी...पुणे : कोरड्या दुष्काळानंतर ओला दुष्काळ आणि त्यात...
तागाच्या पिशव्यांकडे साखर कारखान्यांची...कोल्हापूर : ताग उत्पादकांना चालना देण्यासाठी...
नागपूरात १०.६ अंश तापमान पुणे ः मुंबईजवळील अरबी समुद्रातील चक्रावाताची...
उपयुक्त मधुमक्षिकापालन दुर्लक्षितच! मधमाशी हा निसर्गाने निर्माण केलेला अत्यंत हुशार,...
दर्जानुसारच हवा दरराज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक...
मध ठरू पाहतेय साखरेला पर्याय...खरंच ‘...नागपूर : साखरेमुळे वाढत चाललेल्या आरोग्याच्या...
भविष्यातील आहारामध्ये असतील फुलेहीसामान्यपणे फुलांचे उत्पादन हे व्यावसायिकरीत्या...
खासगी डेअरी उद्योगाला अनुदानाच्या...पुणे  : देशातील दुग्ध व्यवसायाला चालना...
तब्बल 'एवढे' पीकविमा अर्ज दाबून ठेवलेपुणे : पंतप्रधान पीकविमा योजनेत कंपन्या...
शेतकरी म्हणतात...तोपर्यंत बँकांच्या...मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांचा सात बारा उतारा...
बदलत्या वातावरणामुळे आंबेमोहराला विलंबरत्नागिरी ः सोबा चक्रीवादळामुळे कोकणातील वातावरण...
कष्ट, अनुभवातून साकारली भाजीपाला पिकाची...मूळचे सावत्रा (ता. मेहकर, जि. बुलडाणा) गावचे...
देशी बियाण्यांची तयार केली सीड बॅंकभाजीपाला, फुलझाडे आणि विविध औषधी, सुगंधी...