कृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या रेतमात्रा वापरून अधिक दूध देणाऱ्या नवीन संकरित गायी-म्
अॅग्रो विशेष
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढला
पुणे : किमान तापमानात घट होत असल्याने राज्याच्या काही भागांत थंडीचे आगमन झाले आहे. अनेक भागांत धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बुधवारी (ता. २०) नगर येथे राज्यातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंश किंवा त्यापेक्षा खाली घसरल्याने गारठा वाढला आहे. आज (ता. २१) किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडील राज्यातही थंडी वाढत असून, हे थंड वारे वाढल्यानंतर राज्यात गारठा वाढणार आहे. बुधवारी (ता. २०) मध्य प्रदेशातील बेतुल येथे सलग दुसऱ्या दिवशी देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकणात कमाल आणि किमान तापमान अधिक असल्याचे दिसून येत आहे. वेंगुर्ला येथे देशातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर किमान तापमान अद्यापही २० अंशांच्या पुढे आहे. मध्य महाराष्ट्रातील नगरवगळता उर्वरित ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात किमान तापमान कमी झाल्याने गारठा जाणवत आहे.
बुधवारी (ता. २०) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.६ (१), नगर १२.६ (-१), जळगाव १७.०(३), कोल्हापूर २१.४(४), महाबळेश्वर १६.०(१), मालेगाव १६.३ (२), नाशिक १६.३ (२), सांगली २१.० (४), सातारा १७.१ (१), सोलापूर २०.५ (३), अलिबाग २२.० (१), डहाणू २२.१ (१), सांताक्रूझ २१.४ (०), रत्नागिरी २३.२ (१), औरंगाबाद १५.२ (१), परभणी १५.० (-१), नांदेड १६.५ (१), अकोला १५.२ (-१), अमरावती १४.६ (-३), बुलडाणा १५.० (-१), चंद्रपूर १८.२ (२), गोंदिया १५.४ (-१), नागपूर १५.० (-१), वर्धा १६.५ (०), यवतमाळ १५.० (-२).
- 1 of 431
- ››