agriculture news in marathi weather prediction pune maharashtra | Page 2 ||| Agrowon

विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढला

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

पुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने राज्याच्या काही भागांत थंडीचे आगमन झाले आहे. अनेक भागांत धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बुधवारी (ता. २०) नगर येथे राज्यातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंश किंवा त्यापेक्षा खाली घसरल्याने गारठा वाढला आहे. आज (ता. २१) किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता आहे.

पुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने राज्याच्या काही भागांत थंडीचे आगमन झाले आहे. अनेक भागांत धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बुधवारी (ता. २०) नगर येथे राज्यातील नीचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान १५ अंश किंवा त्यापेक्षा खाली घसरल्याने गारठा वाढला आहे. आज (ता. २१) किमान तापमानातील घट कायम राहण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडील राज्यातही थंडी वाढत असून, हे थंड वारे वाढल्यानंतर राज्यात गारठा वाढणार आहे. बुधवारी (ता. २०) मध्य प्रदेशातील बेतुल येथे सलग दुसऱ्या दिवशी देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकणात कमाल आणि किमान तापमान अधिक असल्याचे दिसून येत आहे. वेंगुर्ला येथे देशातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर किमान तापमान अद्यापही २० अंशांच्या पुढे आहे. मध्य महाराष्ट्रातील नगरवगळता उर्वरित ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात किमान तापमान कमी झाल्याने गारठा जाणवत आहे. 

बुधवारी (ता. २०) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १५.६ (१), नगर १२.६ (-१), जळगाव १७.०(३), कोल्हापूर २१.४(४), महाबळेश्वर १६.०(१), मालेगाव १६.३ (२), नाशिक १६.३ (२), सांगली २१.० (४), सातारा १७.१ (१), सोलापूर २०.५ (३), अलिबाग २२.० (१), डहाणू २२.१ (१), सांताक्रूझ २१.४ (०), रत्नागिरी २३.२ (१), औरंगाबाद १५.२ (१), परभणी १५.० (-१), नांदेड १६.५ (१), अकोला १५.२ (-१), अमरावती १४.६ (-३), बुलडाणा १५.० (-१), चंद्रपूर १८.२ (२), गोंदिया १५.४ (-१), नागपूर १५.० (-१), वर्धा १६.५ (०), यवतमाळ १५.० (-२). 


इतर अॅग्रो विशेष
शेवंतीचे तीन वाण लवकरच पुणेः शेतकऱ्यांना शेवंतीच्या पांरपरिक वाणांना...
उत्तर प्रदेशात ‘एसएपी’त बदल नाहीनवी दिल्ली: उत्तर प्रदेश सरकारने सलग दुसऱ्या...
उसाचे ३८ गुंठ्यांत तब्बल १४७ टन उत्पादनकोल्हापूर जिल्ह्यातील कवठेगुलंद (ता. शिरोळ) येथील...
कमी कालावधीचा दोडका देतोय चांगला नफागेल्या दोन, तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पुणे...
तापमानात चढ-उतारपुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात असलेले कमी...
जीवघेणा बाजारदेशात बोगस, भेसळयुक्त, अनधिकृत कीडनाशकांचा वापर...
मत्स्यदुष्काळ का जाहीर होत नाही?शासनाचे मत्स्यदुष्काळाबाबतचे धोरण अत्यंत चुकीचे...
धुळे ९.४ अंश; थंडीत हळूहळू वाढपुणे ः आकाश निरभ्र झाल्याने थंडीत हळूहळू वाढ होऊ...
साईप्रवरा शेतकरी कंपनीची उलाढाल पोचली...नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील...
उन्हाळी नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोगकोल्हापूर : राज्यात उन्हाळी नाचणीचे यशस्वी...
बाजारात रानमेवा खातोय भावअकोला ः गुलाबी थंडीची चाहूल लागताच बाजारात विविध...
बोगस कीडनाशकांची विक्री ४००० कोटींवर ! पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दीडपट...
शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी ‘...सोलापूर : ठाकरे सरकारकडून किचकट ऑनलाइन...
राज्यातील साखर उत्पादन घटणारपुणे: राज्यातील साखर उत्पादन आधीच्या अंदाजाच्या...
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...