agriculture news in marathi weather prediction pune maharashtra | Agrowon

उकाडा वाढला; थंडी लांबणीवर

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

पुणे  : पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण व दमट वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उकाडा वाढत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह महाराष्ट्राकडे न आल्याने गारठाही वाढलेला नाही. मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे राज्यातील निचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे तापमानातील वाढ कायम राहून, थंडी आणखी लांबण्याची शक्यता आहे. 

पुणे  : पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण व दमट वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उकाडा वाढत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह महाराष्ट्राकडे न आल्याने गारठाही वाढलेला नाही. मराठवाड्यातील उस्मानाबाद येथे राज्यातील निचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे तापमानातील वाढ कायम राहून, थंडी आणखी लांबण्याची शक्यता आहे. 

राज्याच्या बहुतांशी भागात कमाल तापमान ३० अंशाच्या पुढेच आहे. कोकणात कमाल तापमान ३४ अंशाच्या पुढे असल्याने उकाडा चांगलाच वाढला आहे. बुधवारी (ता.२७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे राज्यातील सर्वाधिक ३५.४ अशं सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कर्नाटकातील मंगलोर येथे देशातील सर्वाधिक ३७.६ अंश सेल्सिअस, तर मध्य प्रदेशातील बेतूल येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी १०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. रात्रीही उशिरापर्यंत उकाडा कायम राहत असून, पहाटे तापमानात घट होऊन गारठा काहीसा वाढत आहे. मात्र, किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वरच आहे.  

बुधवारी (ता. २७) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १४.९ (२), जळगाव १७.०(४), कोल्हापूर १८.३(२), महाबळेश्वर १४.४(०), मालेगाव १७.८ (५), नाशिक १७.० (५), सांगली १८.४ (३), सातारा १५.५ (१), सोलापूर १७.५ (१), अलिबाग २१.९ (२), डहाणू २२.५ (३), सांताक्रूझ २१.४ (२), रत्नागिरी २१.७ (१), औरंगाबाद १५.६ (२), परभणी १६.२ (२), नांदेड १७.० (३), उस्मानाबाद १२.५ (-२), अकोला १६.० (०), अमरावती १५.६ (-१), बुलडाणा १७.४ (१), चंद्रपूर १७.६ (३), गोंदिया १५.५ (०), नागपूर १४.६ (०), वर्धा १६.० (१), यवतमाळ १५.४ (०).


इतर अॅग्रो विशेष
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...