फुले कृषी विद्यापिठाकडून व्हॉट्सअॅपवर कृषी सल्ला मिळणार 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी हवामान आधारित कृषी सल्ला बनविला जातो.
weather
weather

पुणे (प्रतिनिधी) ः महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी हवामान आधारित कृषी सल्ला बनविला जातो. येत्या काळात हवामानाची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यत पोचविण्यासाठी हवामान आधारित कृषी सल्ला व्हॉट्सअॅपद्वारे देण्यात येणार आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्पाच्या कृषी विद्या विभागातील प्रमुखांनी दिली. 

सध्या दिल्या जात असलेल्या हवामान आधारित कृषी सल्ल्यामध्ये मागील सात दिवसांच्या हवामानाचे आकडे दिली जातात. तसेच पुढील पाच दिवसांचा सविस्तर हवामानाचा अंदाज आणि हवामान आधारीत पीकनिहाय कृषी सल्ला देण्यात येतो. दैनंदिन शेतीचे काम करताना हा हवामान आधारित कृषी सल्ला शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतो. त्यामुळे हवामान आधारित कृषी सल्ला मिळविण्याकरिता शेतकऱ्यांनी ऑनलाइन एक मराठी प्रश्नावली भरावयाची आहे. जे शेतकरी प्रश्नावली भरतील त्यांना हवामान आधारित कृषी सल्ला देण्यात येणार आहे. 

हा कृषी सल्ला सुरूवातील नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता असून इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता काही दिवसात त्या त्या जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी संपर्क साधणार आहे. प्रश्नावलीमध्ये फक्त शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती विचारण्यात येणार आहे. जेणेकरून तालुकानिहाय सविस्तर हवामान आधारित कृषी सल्ला शेतकऱ्यांपर्यत पोचविता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeuRK4X8VFArrV9_PSsqRaPGVp_tbOlNBRubixukGG1y6msEw/viewform?usp=sf_link ही लिंक ओपन करून नोंदणी अर्ज भरणे अनिवार्य आहे.  --------------------------------  प्रश्नावलीमध्ये खालील प्रश्न असतील ः 

  • शेतकऱ्यांचे नाव 
  • व्हॉट्सॲप असलेला मोबाईल क्रमांक 
  • शेतकऱ्यांच्या शेतीचा पत्ता (तालुका व गाव दोन्ही) 
  • खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील प्रमुख पीके 
  • पशुधन तपशील 
  • जोडधंदा, कृषीपूरक व्यवसाय 
  • ई-मेल आयडी 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com