agriculture news in Marathi weather prediction will get on whattsapp Maharashtra | Page 2 ||| Agrowon

फुले कृषी विद्यापिठाकडून व्हॉट्सअॅपवर कृषी सल्ला मिळणार 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 मे 2020

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी हवामान आधारित कृषी सल्ला बनविला जातो.

पुणे (प्रतिनिधी) ः महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी हवामान आधारित कृषी सल्ला बनविला जातो. येत्या काळात हवामानाची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यत पोचविण्यासाठी हवामान आधारित कृषी सल्ला व्हॉट्सअॅपद्वारे देण्यात येणार आहे, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्पाच्या कृषी विद्या विभागातील प्रमुखांनी दिली. 

सध्या दिल्या जात असलेल्या हवामान आधारित कृषी सल्ल्यामध्ये मागील सात दिवसांच्या हवामानाचे आकडे दिली जातात. तसेच पुढील पाच दिवसांचा सविस्तर हवामानाचा अंदाज आणि हवामान आधारीत पीकनिहाय कृषी सल्ला देण्यात येतो. दैनंदिन शेतीचे काम करताना हा हवामान आधारित कृषी सल्ला शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतो. त्यामुळे हवामान आधारित कृषी सल्ला मिळविण्याकरिता शेतकऱ्यांनी ऑनलाइन एक मराठी प्रश्नावली भरावयाची आहे. जे शेतकरी प्रश्नावली भरतील त्यांना हवामान आधारित कृषी सल्ला देण्यात येणार आहे. 

हा कृषी सल्ला सुरूवातील नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता असून इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता काही दिवसात त्या त्या जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी संपर्क साधणार आहे. प्रश्नावलीमध्ये फक्त शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती विचारण्यात येणार आहे. जेणेकरून तालुकानिहाय सविस्तर हवामान आधारित कृषी सल्ला शेतकऱ्यांपर्यत पोचविता येईल. यासाठी शेतकऱ्यांनी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeuRK4X8VFArrV9_PSsqRaPGVp_tbOl...ही लिंक ओपन करून नोंदणी अर्ज भरणे अनिवार्य आहे. 
-------------------------------- 
प्रश्नावलीमध्ये खालील प्रश्न असतील ः 

  • शेतकऱ्यांचे नाव 
  • व्हॉट्सॲप असलेला मोबाईल क्रमांक 
  • शेतकऱ्यांच्या शेतीचा पत्ता (तालुका व गाव दोन्ही) 
  • खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील प्रमुख पीके 
  • पशुधन तपशील 
  • जोडधंदा, कृषीपूरक व्यवसाय 
  • ई-मेल आयडी 

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात टंचाईमुळे जादा दराने...जळगाव : जिल्ह्यात यंदा पेरणी वेळेत झाली, पण...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आदी...
बीड विभागात १८ लाख क्विंटल कापसाची खरेदीबीड  ः राज्य कापूस पणन महासंघाच्या बीड...
महाळूंग येथील कोविड केअर सेंटरला `आयएसओ...सोलापूर : माळशिरस तालुक्‍यातील महाळूंग येथील...
नांदेड, परभणी, हिंगोलीत खतांसाठी...नांदेड : यंदा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांनी...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची धावपळ,...नाशिक : खरीप पिकांना वाढीच्या अवस्थेत खतांची...
पीकविमा प्रस्ताव सादर करण्यासाठी ३१...परभणी : ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
महाराष्ट्राच्या विकासात डॉ. चव्हाण...मुंबई : जनसेवा, राज्याची आणि देशाची सेवा...
सोलापूरसह नजीकच्या गावांमध्ये ...सोलापूर  : सोलापूर शहर आणि शेजारील...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांच्या...नाशिक : खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनची पेरणी...
नगरमध्ये मागणीच्या ५० टक्केच युरिया...नगर ः जोमात असलेल्या खरीप पिकांसाठी युरियाची...
शेतकऱ्याने तुटपुंज्या मदतीचा धनादेश...नाशिक : निसर्ग चक्री वादळाने ३ जून रोजी येवला...
अकोला : आवश्‍यक खते मिळवताना...अकोला ः या हंगामातील पिकांची लागवड होऊन बहुतांश...
सिंधुदुर्गात खते मिळाली; पण वेळेत नाहीतसिंधुदुर्ग ः खरीप हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्यात...
बुलडाण्यात सोयाबीनबाबत २७०० पेक्षा अधिक...बुलडाणा ः निकृष्ट बियाणे तसेच इतर कारणांमुळे...
विदर्भात खत कमतरतेमुळे जादा दराने विक्रीनागपूर : विदर्भातील सर्व जिल्ह्यात सध्या युरियाची...
रत्नागिरी जिल्ह्यात पुरेसा खत पुरवठारत्नागिरी : खरीप हंगामाच्या सुरुवातीला वेळेत खत न...
सांगलीत खतांची कमतरतासांगली ः जिल्ह्यात ८० टक्के खतांचा पुरवठा केला...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारापुणे : राज्यात मॉन्सून सक्रीय होण्यास पोषक हवामान...
मराठवाड्यात आतबट्ट्याचा दुग्ध व्यवसायऔरंगाबाद : दर दिवसाच्या दूध संकलनात फरक पडला नाही...